Thursday, April 25, 2024
Homeताज्या बातम्याChandrapur Congress Lok Sabha Candidate : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून आमदार प्रतिभा धानोरकर...

Chandrapur Congress Lok Sabha Candidate : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून आमदार प्रतिभा धानोरकर कांग्रेसच्या उमेदवार

- Advertisement -
- Advertisement -

Chandrapur Congress Lok Sabha Candidate दोन दिवसांपूर्वी News34 ने आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार यावर वृत्त दिले होते, ती बातमी आज खरी ठरली, कांग्रेस पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना आज लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे.

 

आमदार धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्यावर कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, आमदार धानोरकर या थेट 5 वेळ आमदार व राज्याच्या महत्वाच्या पदावर असलेले मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी निवडणुकीच्या मैदानावर भिडणार आहे. Chandrapur Congress Lok Sabha Candidate

हे ही वाचा – दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सुधीर मुनगंटीवार 26 मार्च रोजी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार

कांग्रेस पक्षाच्या पाचव्या यादीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी 24 मार्च रोजी घोषित करण्यात आली.

 

पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची चुरस आता वाढणार असून मुनगंटीवार यांच्या पुढे आता सहज असलेली लोकसभा निवडणूक रंगतदार असणार आहे. Chandrapur Congress Lok Sabha Candidate

हे ही वाचा : जागते रहो, चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करीत राज्यात एकमेव लोकसभेची जागा बाळू धानोरकर यांनी जिंकली होती, मात्र वर्ष 2023 ला बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झाले, धानोरकर यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा रिकामी झाली होती, मात्र निवडणूक आयोगाने सदर पोटनिवडणूक टाळली. Chandrapur Congress Lok Sabha Candidate

 

27 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, धानोरकर यांना पक्षातील अंतर्गत कलहाला पुढे जावे लागले मात्र शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी मिळाली.

 

भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांची थेट लढत आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी होणार आहे, चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी मतदारांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे, सुधीर मुनगंटीवार हे आर्य-वैश्य समाजातून आहे, सदर लोकसभा क्षेत्रात त्यांचा समाज अत्यल्प आहे, 4 वेळा भाजप पक्षाचे चंद्रपूर लोकसभेतून खासदार असलेले हंसराज अहिर यांचाही समाज अत्यल्प होता मात्र त्यांनी 4 वेळा विजयश्री खेचून आणला होता. Chandrapur Congress Lok Sabha Candidate

हे ही वाचा : चंद्रपूर मनपा दिवाळखोरी च्या मार्गावर

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत कांग्रेस पक्षातून खासदारकीची तिकीट खेचून आणली व पहिल्या वेळी ते राज्यात एकमेव कांग्रेस खासदार म्हणून निवडून आले, त्यांच्याप्रमाणे आमदार प्रतिभा धानोरकर ह्या जायंट किलर ठरणार का हे निवडणुकीत दिसणारच.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!