Chandrapur Police Mission All Out : चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Chandrapur Police Mission All Out लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस एक्शन मोड वर आली असून 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान जिल्ह्यात तब्बल 35 ठिकाणी नाकाबंदी करीत मिशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली.

 

ऑल आऊट मोहिमेदरम्यान 78 हॉटेल, लॉज व धाबे चेक करण्यात आले, यावेळी 821 वाहनांची तपासणी करून 64 वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. Chandrapur Police Mission All Out

 

या मोहिमेत रेकॉर्ड वरील व कारागृहातून सुटलेले व प्रलंबित खटल्यातील 160 समन्स बजावणी करून 61 आरोपीना अटक करण्यात आली.

 

वाचा – सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेत आव्हान देणारा नेता भाजपात सामील

अवैध दारू बाळगणाऱ्यावर तब्बल 22 केसेस, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे 1 व पोलीस स्टेशन येथे 2 केसेस भारतीय हत्यार कायद्यांव्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले. Chandrapur Police Mission All Out

 

तसेच राजुरा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या इसम विरुद्ध गुन्हा नोंद करून 3 लाख 36 हजार 200 रुपयांचा माल असा 8 लाख 36 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर जिल्हा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील 52 पोलीस अधिकारी व 265 पोलीस अंमलदार यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!