Dam incomplete for irrigation : बंधारा बांधकामाचे आदेश निघाले पण….

गुरू गुरनुले

Dam incomplete for irrigation मुल तालुका हा धान उत्पादन करणारा तालुका आहे. परंतु शेतीच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात सिंचनाची सोय झालेली नाही. चिखली – मोरवाही भागात गोसेखुर्द धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्याने या साझातील राजोली, डोंगरगाव, मुरमांडी,गोलाभुज, गांगलवाडी, बेलगाटा, चीतेगाव इत्यादी गावे सिंचन सोई पासून वंचित आहेत.

 

अनेकदा मागणी करूनही शासनाने लक्ष दिले नाही म्हणून केवळ मामा तलावाच्या भरोषावर या भागातील शेतकरी विसंबून आहेत. यासाठी चिखली – मोरवाही परिसरातील शेतकरी बांधवांनी गावाला लागूनच वाहणाऱ्या उमा नदीवर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांची महत्वाची मागणी लक्षात घेऊन शासनाकडे मागणी ही मागणी मंजूर करुन चिखली घाटावर एक बंधारा व मोरवाही घाटावर एक बंधारा मंजूर करण्यात आला. Dam incomplete for irrigation

 

हे काम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने कोटी रुपये खर्चाची निविदाही काढण्यात आली होती. या कामाचे कार्यारंभ आदेशही मे २०२३ लाच कंत्राटदार सहदेव कंत्रक्षण कंपनी नागपूर यांना देण्यात आले होते. कार्यारंभ आदेश प्राप्त होताच सहदेव कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली असती तर चिखली व मोरवाही बंधाऱ्याच्या पाण्याने हजारो हेक्टर जमिनीला याचा फायदा झाला असता व शेतकऱ्यांना धानाचे उत्पन्न उत्तम झाले असते.

वाचा – चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार ठरला

बंधाऱ्याचे काम कंत्राटदाराने केले नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली आहे. पाण्याअभावी खरीप पिके गेलीच आणि यासोबत शेतकऱ्यांना रब्बीपिकेही गहू, चना,लाख, तूर, भाजीपाला,  मका अशी पिके घेता आली नाही. त्यामुळे चिखली मोरवाही गावातील व परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता. मृद् व जलसंधारण विभागाने मजुरी दिलेल्या चिखली व मोरवाही बंधारा बांधकामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही कामाचे कार्यारंभ आदेश देऊनही जर कंत्राटदाराने बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले.

 

याला जबाबदार सहदेव बांधकाम कंपणी नागपूर असून अशा कंपनीचे परवाने तात्काळ रद्द करावे अशी मागणी चिखली मोरवाही येथील शेतकरी व सरपंच नंदू नैताम,माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लहू कडस्कर व उपसरपंच दुर्वास कडस्कर यांनी केली असून शासनाने व मृद्द व जलसंधारण विभागाने संबंधित कंत्राटदाराला त्वरित काम सुरु करण्याची तंबी द्यावी अन्यथा चिखली व मोरवाही येथील शेतकरी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!