Four criminals deported from Chandrapur district : 4 गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार

Four criminals deported from Chandrapur district आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी 4 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.

हे ही वाचा : अम्मा का टिफिन ची माहिती घेण्यासाठी विदेशातून आला पाहुणा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

 

यामध्ये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगार पंचशील वॉर्ड येथील 26 वर्षीय शुभम समुद, अष्टभुजा वार्ड, जयश्री लॉन जवळ राहणारा 29 वर्षीय शारुख नूरखान पठाण, लुम्बिनी नगर बाबूपेठ येथील 31 वर्षीय नैनेश उर्फ लाला नितीन शाहा व वरोरा येथील 25 वर्षीय मोहन केशव कुचनकर यांच्यावर कलम 56(1) (अ)(ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अनव्ये 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. Four criminals deported from Chandrapur district

हे ही वाचा – शहरात चोऱ्या वाढल्या, सीसीटीव्ही मात्र बंद

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नाओमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!