LCB big action in Chandrapur : लोकसभा निवडणुकीची चाहूल आणि चंद्रपुरात 24 लाख 75 हजार जप्त

LCB big action in Chandrapur देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला पध्दतीने पैश्याची देवाण-घेवाण करण्याचे प्रकार वाढत असतात, या सर्व अवैध प्रकारावर आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलीस सजग असून त्यांनी आपलं नेटवर्कही मजबूत केलं आहे.

 

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने या पार्श्वभूमीवर धडक कारवाई करीत 24 लाख 75 हजारांची रोकड जप्त केली आहे, एक इसम दुचाकीवर बॅग मध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेऊन जाणार असल्याची माहिती 7 मार्च ला स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. LCB big action in Chandrapur

 

माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने बल्लारपूर रोडवरील विसापूर टोल नाक्याजवळ सापळा रचला, दुपारच्या सुमारास एक इसम पाठीवर बॅग लटकवून दुचाकीवर येत होता, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला थांबवित विचारपूस केली असता त्याने आपले नाव 34 वर्षीय ज्ञानेश्वर रमेश चनंदबटवे असे सांगितले, त्याच्याजवळ असलेली काळ्या रंगाची बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये 24 लाख 75 हजारांची रोकड पोलिसांना आढळली. LCB big action in Chandrapur

 

ज्यामध्ये 500 रुपयांच्या 4 हजार 652 नोटा एकूण 22 लाख 26 हजार, 200 रुपयांच्या 745 नोटा एकूण 1 लाख 49 हजार रुपये असे एकूण 24 लाख 75 हजार रुपयांची रोकड मिळून आली.

 

इतक्या मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम आढळल्याने पोलिसांना सदर रक्कम चोरी किंवा अवैध मार्गाने प्राप्त केली असा संशय आल्याने सदर रोख रक्कम कलम 41(1) ड अंतर्गत ताब्यात घेण्यात आली असून ज्ञानेश्वर चंदनबटवे याना सोडण्यात आले आहे.

 

इतक्या मोठ्या प्रमाणावरील नगदी कोणत्या मार्गाने व कुठून आली याबाबत ज्ञानेश्वर चंदनबटवे यांना पुरावा सादर करण्यास सांगितले आहे, ज्ञानेश्वर यांनी सांगितले की माझें नंदनवन सदभावना नगर प्लॉट येथे आयुर्वेदिक दुकान आहे, त्याचे हे पैसे आहे, मात्र त्याबाबत त्यांच्याकडे पुरावे नव्हते.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, संतोष यलपुलवार, नितीन रायपुरे यांनी केली असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!