Thursday, April 25, 2024
Homeग्रामीण वार्ताMahila congress celebrate woman's day : कष्टकरी महिलांचा सन्मान हाच आपल्या देशाचा...

Mahila congress celebrate woman’s day : कष्टकरी महिलांचा सन्मान हाच आपल्या देशाचा अभिमान – ममता रावत

- Advertisement -
- Advertisement -

Mahila congress celebrate woman’s day मुल – भारतीय लोकशाहीत महिलांना ५० टक्के आरक्षण देऊनही आजच्या स्थितीत ग्रामीण महिलां मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेत स्वतःच्या कुटुंब प्रमुखापासून तर समाजामध्ये सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही महिलांची पिळवणूक केली जात आहे.

 

निराधार महिलांना काहीच आधार दिसत नाही असं चित्र आज आलेल्या कष्टकरी गरीब महिलांकडे पाहून दिसत आहे. यासाठी कांग्रेस कमिटीने कष्टकरी सन्मान केला आणि त्यांचा उत्साह वाढऊन प्रोत्साहन दिलं हाच सन्मान म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आहे. असे अमूल्य विचार मां दुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा ममता रावत यांनी उद्घघाटन प्रसंगी व्यक्त केल्या. Mahila congress celebrate woman’s day

 

वाचा – चंद्रपुरात 15 वी हत्या, सीसीटीव्ही मध्ये कैद झाली घटना

मुल तालुका व शहर महिला काँग्रेसच्या वतीने मां.दुर्गा मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नम्रता ठेमस्कर, प्रमुख अतिथी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राज्य उपाध्यक्ष तेजस्विनी नागोशे, माजी प्राचार्य मीरा शेंडे, उपस्थित होत्या. Mahila congress celebrate woman’s day

 

अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना नम्रता ठेमस्कर ( आचार्य) केंद्र व राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्यांनी महिला सक्षमी करण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या तरी देखील एवढे दारिद्र्य कसे याचा उत्तर द्यावा. महिलांना उद्देशून ये मोदिकी गॅरंटी असे फलक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वरंभी लाऊन सत्ताधारी पक्ष जाहिरात पसरवीत आहेत. यांना महिलांविषयी आदर तर मग सुरवातीला ३६० रुपयाचा गॅस सिलेंडर अकराशे रुपये कसे काय केले. Mahila congress celebrate woman’s day

 

तसेच हजारो महिलांना रोजगार देण्याऐवजी व सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी केवळ संस्कुत्तिक महोत्सवावर लाखो रुपये खर्च केल्या जात असल्याची बोचरी टीका करीत सत्ता पक्षाचा खरपूस समाचार घेतला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवा कार्य करणाऱ्या कर्तबगार महिला म्हणून दंतरोग तज्ञ डॉ.सायली बोकारे, पोलिस निरीक्षक संजीवनी परतेकी, तर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राज्य उपाध्यक्ष तेजस्विनी नागोशे, व माजी शहर अध्यक्षा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या विभागीय अध्यक्षा रत्ना चौधरी यांचाही त्यांच्या कार्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ शाल श्रीफळ, व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

सत्कारादाखल मनोगत व्यक्त करतांना डॉ.सायली बोकारे, पोलिस निरीक्षक संजीवनी परतेकी, तेजस्विनी नागोशे, यांनीही महिलांच्या सक्षीकरणावर सविस्तर उदाहरनदाखल मनोगत व्यक्त केले. ३० कष्टकरी महिलांना गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन शहर सचिव शामल बेलसरे यांनी केले. महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार यांनीही विचार व्यक्त केले.मान्यवर कर्तबगार महिलांचा परिचय टिना ठाकरे यांनी करुन दिला.प्रास्ताविक शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, यांनी केले.

 

या दिनानिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आभार समता बनसोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय पडोळे, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, केदारनाथ कोटगले,संदीप मोहबे, विष्णू सादंमवार, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सीमा भसारकर,माजी न.से.लीना फुलझेले, नाजुका लाटकर,मैथिली हेडाऊ, मनोज दमंपल्लीवार,यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!