Deportation of criminals from Chandrapur अवैध दारूविक्र, भांडण, मारहाण, धमकी असे विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पंचशील वार्डातील रहिवासी 26 वर्षीय शुभम अमर समुद या सराईत गुन्हेगारांला जिल्ह्यातून 6 महिण्याकरिता हद्दपार केले आहे. Deportation of criminals from Chandrapur
वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू
शुभम समुद वर अनेक गुन्हे दाखल आहे, त्याच्यावर पोलिसांनी यापूर्वी कारवाया केल्या मात्र त्यामध्ये काही सुधारणा झाली नाही, वारंवार पोलिसांनी शुभम वर प्रतिबंधात्मक कारवाई केली, मात्र तो धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यस्था बिघडू नये याकरिता शहर पोलीस निरीक्षकांनी शुभम विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी विहित मुदतीमध्ये हद्दपार च्या प्रस्तावाची प्राथमिक चौकशी केली, त्यानंतर हद्दपारीचा आदेश काढण्यात आला. Deportation of criminals from Chandrapur
पोलिसांकडून होत असलेल्या कारवाया व हद्दपारीच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे, गुन्हेगारी वृत्ती संपावी व त्यांनी गुन्हेगारी पासून इतर धंद्याकडे वळावे अन्यथा अश्या कारवाया होत राहणार असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कळविले आहे.