National Health System Contract Workers : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संघर्षाला यश

National Health System Contract Workers
राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेच्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे.

वाचा – सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी निर्भय बनो सभा रेड सिग्नल

राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पदावर कार्यरत होते. त्यांनी शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने केली. यासंदर्भात त्यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांना शासन दरबारी ठेवण्याची विनंती केली. National Health System Contract Workers

वाचा – जिल्ह्यातील या सावकारांचे परवाने रद्द

या संदर्भात आमदार धानोरकर यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन सदर विषय मार्गी लावावा या संदर्भात विनंती केली. विधानसभेत लक्षवेधी लावून सभागृहाचे लक्ष वेधले व या आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात शासनाला व नागरिकांना केलेल्या मदतीची माहिती करून दिली. National Health System Contract Workers

 

शासनाने आमदार धानोरकर यांना शब्द दिला होता व लवकरच यावर निर्णय घेऊ असे सांगितले होते. वारंवार या विषयाचा पाठपुरावा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने त्याची फलश्रुती प्राप्त झाली असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात लवकरच शासन निर्णय निघणार असून हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. National Health System Contract Workers

 

याबाबत राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार धानोरकर यांचे आभार मानले असून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असे मत व्यक्त केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!