Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech 14 मार्चला चंद्रपुरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात निर्भय बनो सभेला हजारो नागरिकांनी प्रतिसाद देत आपली उपस्थिती दर्शविली, नरेंद्र मोदी, अमित शाह कसे देशातील नागरिकांना मूर्खात काढत आहे याबाबत उपस्थित वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
निर्भय बनो सभा सायंकाळी 5 वाजतापासून सभास्थळी गर्दी जमायला लागली, लहानापासून ते वृद्धापर्यंत नागरिक सभेच्या दिशेने येऊ लागले, भावी पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला काय करायला हवं यासाठी हजारो नागरिक सभास्थळी जमा झाले. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech
वाचा – A to Z बाजाराला भीषण आग
ऍड असीम सरोदे व विश्वंभर चौधरी या दोन वक्त्यांनी सभास्थळ गाजवून दिले, केंद्र सरकारच्या योजनांची पोलखोल या सभेच्या माध्यमातून करण्यात आली, नुकताच संपन्न झालेला ताडोबा महोत्सव कुणासाठी होता? तो कोट्यवधी रुपयांची उधळण ही सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमोशनसाठी होती, असे वक्तव्य सरोदे यांनी यावेळी केले. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech
वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील 23 सावकारांचे परवाने रद्द
लंडन मधून येणारे वाघनखे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करीत राजकारण करण्याचा डाव सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार करीत असल्याची माहिती या सभेच्या माध्यमातून देण्यात आली. आजची ही सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल आहे. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech
सरकार अनेक नव्या योजना आणतात, मात्र त्या योजनांचे पुढे काय होते, हे कुणालाच कळत नाही, त्या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होतात ते फक्त जाहिरात बाजीवर, आज चंद्रपूर शहर हे पूर्णतः प्रदूषित झाले आहे, आपल्या जनप्रतिनिधी यांना निर्भयपणे विचारा चंद्रपुरातील प्रदूषित वातावरण कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करीत आहे?
वाचा – सुरू झाली चंद्रपूर ते मुंबई रेल्वेसेवा
विश्वंभर चौधरी यांनी या सभेचा उद्देश काय? याबाबत सांगत आपण आपल्या भावी पिढीचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, याबाबत आम्ही जनजागृती करण्यासाठी आलो आहे असे सांगितले, चंद्रपुरात अनेक समस्या आहे, मानवनिर्मित पूर, प्रदूषण मात्र यावर उपाययोजना काहीच नाही.
वर्ष 2024 मध्ये मतदान करताना फक्त इतकं लक्षात ठेवा, संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे, मतदानाच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech
चंद्रपुरातील निर्भय बनो सभेला हजारो नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.