News34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल – दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जनजाती सुरक्षा मंचच्या मार्फतिने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पश्चिम बंगाल येथील संदेशखाली गावातील महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचारा बद्दल आदिवासी महिलांना न्याय मिळावे यासाठी सुरक्षा मंच संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. Suraksha manch
महिलांवरील झालेल्या अत्याचार आम्ही कदापि सहन केले जाणार नाही असे जनजाती सुरक्षा मंचच्या जिल्हा सहमहिला प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षा परचाके यांनी सांगितले. तसेच जिल्हा संयोजक भारत आत्राम व जिल्हा सहसंयोजक धनराज कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. Justice
सुरक्षा मंचचे महानगर संयोजक अरविंद मडावी सहयोगी संघटना म्हणून वनवासी कल्याण आश्रमचे विभाग प्रमुख भालेकर जिल्हा अध्यक्ष खममकर विभाग संघठन मंत्री प्रज्योत हेपट जिल्हा महिला प्रमुख विभावरी वखरे प्रांत सह महिला प्रमुख प्राजक्ता भालेकर जिल्हा कोषप्रमुख शेखर देशमुख सिमा मडावी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे चिन्मय भागवत राष्ट्र सेविका समिती चे अंजली हिरूरकर भारतीय स्रिशक्ती च्या भाग्यश्री फाटक.तसेच महिला समन्वय च्या भगिनी उपस्थित होत्या. शासन स्तरावरून आमचे निवेदन तात्काळ संबंधित शासनाकडे त्वरित सादर करून आमच्या मागणीला त्वरित न्याय मिळऊन द्यावे, अन्यथा आंदोलना सारखा मार्ग स्वीकारा लागेल असा इशाराही दिला आहे. Tribal woman