News34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल : मनुस्मृतीला गाडून निर्माण करण्यांत आलेली राज्यघटना अलीकडील काळात धोक्यात आली असून मोदी सरकार लोकशाही संपुष्टात आणून पुन्हा मनुस्मृतीचे राज्य उदयास आणण्याचे कारस्थान रचत आहे. असे झाल्यास स्वतंत्र भारताच्या नागरीकांना पुन्हा गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल. हे लक्षात घेवून प्रत्येक नागरीकांनी सजग राहणे काळाची गरज झाली आहे. असे मत अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.
आम्ही भारताचे लोक तालुका मूल या संस्थेच्या वतीने स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजीत अमृतकाळात भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर आयोजीत व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. Indian democracy
स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरीकाचा अभ्यास आणि विचार करून अथक प्रयत्नाने लिहीण्यांत आलेल्या सर्वसमावेश अश्या राज्यघटनेतील कलम आणि अधिनियमांद्वारे देशाचा कारभार सुरळीत सुरू असतांना मागील काही वर्षापासून काही मंडळी राज्यघटनेला डावलुन देशात सांप्रदायीक वातावरण निर्माण करून नागरीकांनामध्यें द्वेष, असुरक्षीतता, भावना चेतवुन दंगली घडविण्याचे काम करीत असल्याचा आरोप प्रा. श्याम मानव यांनी केला. Threat to Constitution
डार्वीनचा उत्क्रांतीवादाचा सिध्दांत शालेय अभ्यासक्रमामधून वगळण्याचे कारस्थान करणारे विद्यमान शासनकर्ते अंधश्रध्दा पसरविण्याचे काम करीत असलेल्या धिरेंद्र महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणारा गोडसेचे गोडवे गाणा-या कालीचरण महाराज, गांधीना मुस्लीमांची औलाद म्हणणा-या संभाजी भिडे या दुस-यांच्या जीवनात चिवडा चिवड करणा-या मंडळीना प्रौत्साहन देण्याचे काम करीत असल्याचे सांगतांना प्रा.श्याम मानव यांनी न्याय हक्काकरीता आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांवर वेगवेगळया आयुधांचा वापर करून शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करणारे मोदी असंवेदनशील असल्याचा आरोप केला. Modi government
राज्य आणि देशात कंत्राटी नोकर भरतीची पध्दत अंमलात आणून सुशिक्षीत बेरोजगारांची मस्करी केल्या जात आहे. महागाईनेही डोके वर काढले आहे, जाती धर्माचे राजकारण करून लोकशाहीला धोक्यात आणण्याचे कारस्थान रचल्या जात असल्याचे सांगतांना प्रा. श्याम मानव यांनी कारवाईच्या भितीपोटी देशातील न्याय व्यवस्था प्रचंड दबावात असून निवडणुक आयोग, गृहविभाग व इतरही प्रशासकिय यंञणा शासनकर्त्यानी पट्टे बांधुन ठेवल्याचे सांगीतले. Manusmriti
नोटबंदी आणि कोविड काळात मोदींनी घेतलेले निर्णय अत्यंत चुकीचे असून ईडी आणि सीआयडी च्या नांवाने दबाव तंत्राचा वापर करून करण्यांत येत असलेले पक्ष फोडीचे राजकारण लोकशाहीला घातक ठरणारे आहे. त्यामूळे स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरीकाला लोकशाही अस्तित्वात ठेवायची असेल तर मोदी हटाव-देश बचाव हा नारा जोपासला पाहिजे. असे आवाहन केले. सामाजीक कार्यकर्त्या तथा बालरोग तज्ञ डाॅ. अभिलाषा गावतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ.अनिता वाळके यांचे हस्ते झाले. Equally and justice
यावेळी अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमूरे, धनगर समाज संघर्ष समितीचे विदर्भ अध्यक्ष डाॅ. तुषार मर्लावार, साहित्यीक प्रब्रम्हानंद मडावी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, व्हाॅईस आँफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु गेडाम, प्राचार्य अशोक झाडे, गंगाधर कुनघाडकर, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. वासीम राजा, संपत कन्नाके, डेव्हीड खोब्रागडे, संजीवनी वाघरे, जयश्री चन्नुरवार, गुरू गुरनूले आदि मंचावर उपस्थित होते. यावेळी डाॅ. अनिता वाळके, डाॅ. अभिलाषा गावतुरे आणि सुरेश झुरमूरे यांनी मनोगत व्यक्त केले. हिरालाल भडके यांनी प्रास्ताविक, नंदकिशोर शेरकी यांनी संचलन तर साक्षी गुरनूले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येनी उपस्थित होती.