Jagrut Muslim vikas manch : निराधारांना आधार ठरलं जागृत मुस्लिम विकास मंचाचा उपक्रम

Jagrut Muslim vikas manch चंद्रपूर – हाजी सैय्यद हरून संस्थापक अध्यक्ष जागृत मुस्लिम विकास मंच द्वारे 26 शिलाई मशीन गरीब निराधार महिलांना वाटप करण्यात आले. जागृत विकास मंच द्वारे मागील अनेक वर्षापासून समाजातील निराधार अधिकारी लोकांना आधार देण्याचे चे काम केले जात आहे.

अवश्य वाचा : रेमल चक्रीवादळ कोसळणार

याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 25 मे 2024 ला स्थानिक केजीएन लॉन या ठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम समाजातील निराधार विधवा परितक्त्या घटकातील महिलांना शिलाई मशीन वितरित करण्यात आले.

प्राणी गणना : ताडोबा अभयारण्यात प्राणी गणना संपन्न

Jagrut Muslim vikas manch तसेच यावेळी मुस्लिम समाजातील खतना धार्मिक परंपरा सुद्धा पार पाडण्यात आली जवळपास 50 मुलांचे खतना निशुल्क संस्थेच्या मार्फत करण्यात आली.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद हाजी हारून व प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता हैदर सेठ यांची उपस्थिती होती एवढी मंचावर अधिवक्ता मोहम्मद रफी शेख सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद इरफान शेख एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमान भाई खवातिने इस्लाम संस्थापक अध्यक्ष शाही बाजी शेख शिरेन कुरेशी मॅडम रफी अहमद की दवाई शाळेचे मुख्याध्यापिका नियाज खान शिफा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौसर खान यांची यांची प्रमुखतेने उपस्थिती होती.

महत्वाचे : घरबसल्या एका क्लिकवर मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

Jagrut Muslim vikas manch कार्यक्रमाची सुरुवात अतिथी सत्कार करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता हैदर शेठ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय उसकी महत्त्व संघर्ष समितीचे प्रवक्ते रफिक शेख यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खान यांनी यशस्वीरित्या पार पाडले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमिर खान अयुब भाई शरीफ खान सलीम खान जाकिरभाई जाफरभाई आदींनी अथक परिश्रम घेतले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!