Warora Naka Chowk Chandrapur 3 दिवसांपूर्वी वरोरा नाका चौकात मालवाहू ट्रक थेट डिव्हायडर वर चढला होता, आता 22 मे ला रात्री 9.15 वाजता एक हायवा ट्रक पुन्हा रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिव्हायडर वर चढला, यामध्ये सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही, जोपर्यंत याठिकाणी कुणाचा जीव जाणार नाही तोपर्यंत प्रशासन मुकदर्शक बनून राहणार असे चित्र निर्माण झाले आहे.
महत्वाची बातमी : दारू सोडवण्यासाठी युवक गेले मात्र औषध पिल्यावर त्यांचा मृत्यू झाला
Warora Naka Chowk Chandrapur वरोरा नाका उड्डाणपूलावर आधी अनेक अपघात झाले, अपघातात मृत नागरिकांचा आकड्याने पन्नाशी गाठली त्यानंतर त्रुटीपूर्ण पुलाची दुरुस्ती करण्यात आली, अपघात आता कमी झाले मात्र पुलाच्या खाली मात्र ट्रक पलटी, होणे डिव्हायडर चढणे हे प्रकार आता वाढत आहे.
घरबसल्या चंद्रपूर मनपाच्या या सेवांचा लाभ घ्या
Warora Naka Chowk Chandrapur Mh34AB9126 हा हायवा ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात होता, मात्र आज वादळी वारा व पाऊस सुरू असल्याने वाहन चालकाला रस्त्याच्या मध्ये असलेला डिव्हायडर न दिसल्याने ट्रक थेट अतिवेगात डिव्हायडर वर चढला.
विवाह प्रमाणपत्र काढा ऑनलाइन, या स्टेप्स करा फॉलो
वरोरा नाका चौकात मागील अनेक दिवसांपूर्वी सिग्नल लावण्यात आले मात्र अद्याप ते सुरू झाले नाही, बंद अवस्थेत असलेला सिग्नल उदघटनाच्या प्रतीक्षेत आहे.
मे महिन्यात तब्बल 3 अपघात या पुलाखाली झाले असून ते आजही सतत सुरूच आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक विभाग यावर काही ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही आहे.
मोठा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे.