overcoming alcohol addiction
आजची तरुणपिढी विविध व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांचं आयुष्य उध्वस्त होत आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात व्यसन सोडण्यासाठी गेलेल्या युवकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
अवश्य वाचा : तर चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार बंद होणार
overcoming alcohol addiction भद्रावती तालुक्यातील वडेगाव(गुळगाव) येथील तरुणांनी दारू सोडण्याची औषध घेतली असता काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्याचदिवशी त्यांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे.
महत्वाची : घरबसल्या काढा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
गावातील 19 वर्षीय सहयोग सदाशिव जीवतोडे, 26 वर्षीय प्रतीक घनश्याम दडमल ही मृतकाची नावे आहे तर 45 वर्षीय सदाशिव पुंजाराम जीवतोडे व 35 वर्षीय सोमेश्वर उद्धव वाकडे हे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
सदाशिव जीवतोडे व त्यांच्या 19 वर्षीय सहयोग या मुलाला दारूचे अतिव्यसन जडले होते, घरातील दोघे दारूच्या आहारी गेल्याने कुटुंबातील वातावरण बिघडले होते.
overcoming alcohol addiction त्यासाठी सदाशिव जीवतोडे, सहयोग जीवतोडे यांच्यासह प्रतीक दडमल व सोमेश्वर वाकडे यांनी दारू सोडण्याचा निर्णय घेतला, 21 मे रोजी चौघे वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे शेळके नामक वैद्याकडे गेले असता त्यांनी चौघांना दारू सोडण्याचे औषध दिले, चौघांनी ते औषध तिथे घेत आपल्या गावाची वाट धरली, मात्र काही वेळात औषध घेतल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
चौघेही त्याच अवस्थेत आपल्या स्वगावी सायंकाळी दाखल झाले, मात्र त्यांची अस्वस्थता वाढल्याने त्यांना भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात नेत असताना सहयोग व प्रतीक चा वाटेतच मृत्यू झाला.
overcoming alcohol addiction विशेष म्हणजे दोघांचा मृत्यू झाल्यावर गावातील नागरिकांनी दोघांचे मृतदेह गावात नेत अंत्यसंस्काराची तयारी केली, दोघांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची बाब भद्रावती पोलिसांना कळल्यावर ते सरळ वडेगाव येथे दाखल झाली, व दोघांचे मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविण्यात आले, शवविच्छेदन चा अहवाल आल्यावर पोलीस पुढची कारवाई करणार आहे.
पोलीस भरती मध्ये हा नियम ठरणार अडसर
याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली असता त्यांनी सांगितले की आम्हाला ज्यावेळी दोघांचा मृत्यू झाला असल्याची बाब कळली त्यावेळी आम्ही चौकशी केली असता गावातील चार जण दारू सोडण्याचे औषध घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे गेले त्यांनी त्याठिकाणी औषध घेत गावाची वाट धरली मात्र त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने, रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला, सध्या संपूर्ण चौकशी करीत याबाबत वर्धा पोलिसांसोबत चर्चा करून त्या औषधामुळे पुन्हा अश्या काही घटना घडल्या का याबाबत सुद्धा तपास करणार अशी माहिती दिली.