Chandrapur News : तर चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार बंद होणार – भाजप नेते मनोज पाल

Chandrapur news चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविल्यावर जिल्ह्यात तब्बल 400 नव्या बिअर बार ला परवानगी देण्यात आली होती.

अवश्य वाचा : आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना दाखविला मराठी चित्रपट जुनं फर्निचर

मात्र या बार ला परवानगी देताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले, हे सर्व कारस्थान उत्पादन शुल्क चंद्रपूरचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात झाले असा आरोप भाजप नेते मनोज पाल यांनी 20 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

अवश्य वाचा : यादिवशी जाहीर होणार महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डाचा निकाल

Chandrapur news वर्ष 2015 मध्ये चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आला होता, त्यावेळी राज्यात भाजपची सरकार होती, दारूबंदी नंतर 7 वर्षांनी महाविकास आघाडी सरकारने हटविली, त्यावेळी जिल्ह्यात एकूण 350 बिअर बार होते.

 

Chandrapur news त्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात नियमबाह्य पध्दतीने 400 बिअर बार ची परवानगी देण्यात आली, यामध्ये अनेक बिअर बार धारकाकडे नियमानुसार कागदपत्रे नाहीत, संजय पाटील यांनी अर्थकारण करीत नियमांना धाब्यावर बसविले व नव्या बार ला परवानगी देण्यात आली.

अवश्य वाचा : एका क्लिक वर निघणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

Chandrapur news विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील व इतर दोन अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.

भाजप नेते मनोज पाल यांनी जिल्ह्यातील सर्व बार, देशी भट्टी व वाइन शॉप बाबत माहिती अधिकारात माहिती मागितली असून त्यांनतर नियमबाह्य दारू दुकानांबाबत मी स्वतः प्रशासनाकडे तक्रार करणार, प्रशासनाने कारवाई केली तर जिल्ह्यातील 200 बिअर बार नक्कीच बंद होणार. यासाठी माझी लढाई ही सुरू राहणार अशी प्रतिक्रिया पाल यांनी यावेळी दिली.
आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या डॉ.भारती दुधानी, उज्वला नलगे यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!