Mahesh Manjrekar New Movie : नागरिकांनी बघितलं जुनं फर्निचर

Mahesh Manjrekar New Movie पुस्तकातून जे ज्ञान कमी मिळत ते अनुभवातून एकदातरी मिळतेच, आजच्या सामाजिक जीवनात प्रत्यक्ष अनुभव व काही सामाजिक चित्रपटातून हा संदेश नागरिकांमध्ये काही बदल घडविण्याचे काम नक्की करतोच.

अवश्य वाचा : ओबीसींच्या अधिवेशनात हा होणार ठराव

असाच एक समाजात बदल घडविण्याचे काम अभिनेता महेश मांजरेकर यांच्या जुनं फर्निचर या चित्रपटातून होताना दिसत आहे.

 

Mahesh Manjrekar New Movie चंद्रपूर चे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी वृद्ध नागरिक, त्यांनतर पालक व मुलांसाठी मराठी चित्रपट जुनं फर्निचर चा विशेष शो आयोजित करीत आई-वडिलांबद्दल मुलांचं मत बदलावं याचा प्रयत्न करीत आहे.

अवश्य वाचा : भानुसखिंडी च्या बछड्याला वनविभागाने पकडले

Mahesh Manjrekar New Movie 19 मे रोजी शहरातील अडलॅब्स चित्रपटगृहात आई-वडील व मुलांसाठी विशेष शो चे आयोजन आमदार जोरगेवार यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

माहिती महत्वाची : घरीबसून एका क्लिकवर निघणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र, या स्टेप्स करा फॉलो

चित्रपट बघितल्यावर महिलांनी याबाबत महत्वाच्या प्रतिक्रिया दिल्या, सदर चित्रपटातील जो विषय आहे तो आमच्या मनाला लागून गेला, आज आई-वडील जीवाच रान करीत मुलांना शिकवितात, मात्र त्यानंतर पुढील शिक्षण व नोकरीसाठी परदेशात जातात तेव्हा मात्र ते आई-वडिलांना विसरण्याचे काम करतात, आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केलं? जे आजची पिढी विसरत चालली आहे, मात्र मराठी चित्रपट जुनं फर्निचर हा आई-वडिलांप्रती मुलांचं काय कर्तव्य आहे हे दाखवून देत, हा चित्रपट प्रत्येक मुलांनी बघावा जेणेकरून काही प्रमाणात बदल नक्कीच घडेल.

अवश्य वाचा : 79 लाखांचे कपाशीचे चोर बीटी बियाणे जप्त

Mahesh Manjrekar New Movie आमदार जोरगेवार यांनी याबाबत सांगितले की मराठी चित्रपटसृष्टीततील नामवंत अभिनेते महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट आजच्या पिढीने आवर्जून बघितल्यास देशात जे वृद्धाश्रम तयार झाले आहे ते सर्व एकदिवस नक्कीच संपणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!