Illegal Sand Transport प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात भिसी पोलिसांनी जप्त केलेला रेती भरलेला ट्रॅक्टर आणि कारवाईचे दृश्य.

illegal sand transport | भिसीत अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 16, 2026

illegal sand transport : भिसी चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दिनांक १६ मे २०२६ रोजी रात्रपाळीच्या कर्तव्यावर असलेले ड्युटी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ यांना एका गोपनीय सूत्राकडून महत्त्वाची माहिती मिळाली. कोटगाव येथून एक ट्रॅक्टर अवैध रित्या रेती भरून येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. (पती-पत्नीने सुरु केला देहव्यापार, ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई)

माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाकडे कूच केली. या पथकात पोलीस अंमलदार स्नेहल खोब्रागडे (बक्कल नंबर १६१०) आणि सरकारी वाहन चालक पोलीस हवालदार हबीब पठाण (बक्कल नंबर ७७४) यांचा समावेश होता. सरकारी वाहनाने कोटगाव परिसरामध्ये पोहोचून पोलिसांनी पाळत ठेवली असता, संशयास्पद ट्रॅक्टर (क्रमांक MH-40 CA-1296) येताना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना अवैध रित्या रेतीची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.

चंद्रपूर जिल्ह्यात illegal sand transport विरोधात भिसी पोलिसांची कारवाई

या कारवाईदरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टर चालक तथा मालक अमृत सूर्यभान जांभुळे (वय ३६ वर्ष, रा. कपरला) याला ताब्यात घेतले. शासकीय परवानगी किंवा कोणताही वैध परवाना नसताना रेतीची चोरी करून वाहतूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भिसी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीवर अपराध क्रमांक १५१/२६ आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. illegal sand transport

पोलिसांनी घटनास्थळावरून पंचांच्या समक्ष ५,००,००० रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि ५,००० रुपये किमतीची एक ब्रास रेती, असा एकूण ५,०५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भिसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे यशस्वी झाली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार अजय बगडे (बक्कल नंबर ६८८) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment