गडचांदूर – Gadchandur Missing Girl प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली असून तिच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (नोकरीसाठी गुन्हे लपविले, बनावट प्रमाणपत्र केलं सादर)
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातून एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तोंडी तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. १६ जून २०२६ रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
Gadchandur Missing Girl प्रकरण नेमके काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी ही येथील एका आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे. सध्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने ती गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या घरी राहण्यासाठी आली होती. सोमवार, १५ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ती आपल्या मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, रात्र झाली तरी ती परत न आल्यामुळे तिच्या आईने मैत्रिणीकडे आणि गावातील इतर नातेवाईकांसह ओळखीच्या लोकांकडे सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जून रोजी दिवसभर शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्याने अखेर तिच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
आपल्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईने तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश राजेंद्र अनभुले यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने आणि सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






