Chandrapur Congress Dispute प्रकरणात हायकोर्टाची स्थगिती

“विभागीय आयुक्तांचा आदेश थांबवला; ६ जुलैपर्यंत अडूर गटनेतेपदी”

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 22, 2026

चंद्रपूर: Chandrapur Congress Dispute प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश देत नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदावरील वादात न्यायालयाने सुरेंद्र अडबाले यांच्या नियुक्तीच्या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली. या निर्णयामुळे राजेश अड्डूर यांना मोठा दिलासा मिळाला असून चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (बार बंद करा, नागरिकांचा रस्ता रोको)

चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेते पदावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी १७ जून रोजी काँग्रेसचे गटनेते म्हणून सुरेंद्र अडबाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार झटका दिला आहे. मा. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या त्या आदेशाला पूर्णपणे स्थगिती (Stay) दिली असून, पुढील सुनावणी ६ जुलै २०२६ रोजी ठेवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता राजेश अड्डूर हेच काँग्रेसचे अधिकृत गटनेते पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Chandrapur Congress Dispute मध्ये नेमके काय घडले?

काही दिवसांपूर्वी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त यांनी एक आदेश जारी करून चंद्रपूर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून कार्यरत असलेले राजेश मुरली अड्डूर यांचे नाव रद्द केले होते आणि त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद केली होती. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाविरुद्ध राजेश अड्डूर यांनी एडव्होकेट ए. एम. घारे यांच्यामार्फत हायकोर्टात रिट याचिका दाखल केली.

२२ जून २०२६ रोजी या याचिकेवर मा. न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि मा. न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच, अंतरिम दिलासा देत विभागीय आयुक्तांनी सुरेंद्र अडबाले यांच्या गटनेते पदाबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती दिली. (जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड)

कोर्टाच्या या स्थगिती आदेशानंतर याचिकाकर्त्यांचे वकील एड. ए. एम. घारे यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त, नागपूर यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. हायकोर्टाच्या स्थगिती आदेशामुळे राजेश अड्डूर हेच चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेस गटाचे निर्वाचित गटनेते म्हणून कायम आहेत, त्यामुळे प्रशासनाने आता महाविकास आघाडी किंवा काँग्रेस गटाच्या वतीने श्री. अड्डूर यांच्याशिवाय इतर कोणत्याही नगरसेवकाचा किंवा व्यक्तीचा कोणताही पत्रव्यवहार अथवा संपर्क स्वीकारू नये, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजेश अड्डूर यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे, या आदेशामुळे खासदार धानोरकर गटाला मोठा धक्का बसला आहे.

चंद्रपूर मनपा निवडणूका झाल्यावर कांग्रेस पक्षात गटनेतेपदावरून संघर्ष वाढला होता, धानोरकर गटाने सुरेंद्र अडबाले यांची तात्काळ गटनेतेपदी नियुक्ती केली, मात्र अंतर्गत संघर्ष या पदावरून वाढल्याने वडेट्टीवार गटाने हाय कोर्टात धाव घेतली, त्यानंतर वडेट्टीवार गोटातील नगरसेवक राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, मात्र काही कालावधी लोटल्यावर अडूर हे आपल्याच पक्षातील नगरसेवकांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करीत १६ नगरसेवकांनी थेट अडूर यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयात अविश्वास दाखवीत अडूर याना गटनेतेपदावरून हटविले, आता अडूर यांनी न्यायालयाचे दार ठोठावीत सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवडीला विरोध केला.

न्यायालयाने अडबाले यांच्या निवडीला स्थगिती दिल्याने अडूर पुन्हा आपल्या पदावर परतले. मात्र त्यांचं पद हे ६ जुलै पर्यंत असणार त्यादिवशी न्यायालयाच्या सुनावणीत काय होणार त्यांचं पद राहणार कि अडबाले हे गटनेतेपदी कायम राहणार? हे ६ जुलै रोजी समजेल.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment