Chandrapur MD Powder Raid : जटपुरा गेट येथील इटनकर पान ठेल्यावर गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूरच्या जटपुरा गेट येथील प्रसिद्ध इटनकर पान ठेल्यावर एमडी पावडरचा साठा; दोन आरोपी अटकेत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 26, 2026

चंद्रपूर – Chandrapur MD Powder Raid प्रकरणात चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील प्रसिद्ध इटनकर पान ठेल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत १०४.२१० ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल आणि रोख रक्कम असा ६.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये २५ वर्षीय ओम संतोष उर्फ बापू इटनकर व इरफान उर्फ भुऱ्या पठाण यांचा समावेश आहे. (व्हाट्सअप वर लाखोंचे कर्ज मंजूर चा मॅसेज, आणि झाली लाखोंची फसवणूक)

तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाई सध्या राज्यात खर्रा व पान मसाला आणि गुटखा भेटणे कठीण झाले असताना नुकसानीची भरपाई म्हणून आता पान ठेला चालक अवैध धंद्याकडे वळले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध इटनकर पान ठेल्यावर एमडी पावडरची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

Chandrapur MD Powder Raid मध्ये नेमके काय जप्त झाले?

माहितीच्या आधारे गुन्हे शाखा निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पथकाने इटनकर पान ठेल्यावर छापेमारी केली. ओम इटनकर ला यावेळी ताब्यात घेत घरझडती घेतली असता १०४.२१० ग्राम एमडी पावडर, सह २ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी ओम इटनकर ची चौकशी केली असता त्याने एमडी पावडर बगलखिडकी भागात राहणाऱ्या इरफान उर्फ भुऱ्या पठाण कडून विकत घेतला असे सांगितले. पोलिसांनी इरफान उर्फ भुऱ्या पठाण ला केली. (व्हाट्सअप वर लोन मंजूर, पुण्यातील आरोपीला अटक)

दोन्ही आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या अंमली पदार्थाच्या विक्री व आर्थिक व्यवहाराची साखळी गुन्हे शाखेतर्फे शोधण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणी अजून खुलासे व आरोपीना अटक होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि डोके, पोलीस पथक सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, सुनील आत्राम, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, प्रतीक हेमके, छाया, अपर्णा व श्वान पथकातील राजेश किन्नाके व विनोद चव्हाण यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment