Warora House Theft : गिरीपुंजे कॉलनीतील बंद घरात झालेल्या घरफोडीनंतर घटनास्थळी पोलीस

वरोरा गिरीपुंजे कॉलनीत बंद घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 29, 2026

चंद्रपूर – (Warora House Theft) प्रकरणामुळे वरोरा शहरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आनंदवन चौक परिसरातील गिरीपुंजे कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (मालमत्तेच्या वादात मुलाने केली वडिलांची हत्या)

जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवन चौक परिसरातील चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गिरीपुंजे कॉलनीत एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सौ. उषा सेवकराम बांगडकर (वय ४७) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

Warora House Theft : गिरीपुंजे कॉलनीत नेमके काय घडले?

उषा यांचे पती सेवकराम बांगडकर हे आनंदवन अंध विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दोन्ही मुली चंद्रपूर आणि नागपूर येथे हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत असल्याने, बांगडकर पती-पत्नी २७ जून २०२१ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून नागपूर येथे आपल्या लहान मुलीला भेटण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २८ जून रोजी संध्याकाळी ७:३० वाजता ते नागपूरवरून परत आले. वरोरा येथे आल्यानंतर आनंदवन येथील आठवडी बाजारातून भाजीपाला खरेदी करून जेव्हा ते रात्री ८:१५ च्या सुमारास घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.

धक्कादायक बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ शेजारी राहणाऱ्या विजय खरशे यांना बोलावले आणि त्यांच्यासोबत घरात प्रवेश केला. घरात बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि कपाटाचे दार तसेच ड्रॉवर उघडे होते. कपाटाची पाहणी केली असता, त्यात ठेवलेले १ लाख ५० हजार रुपये रोख, १ लाख २० हजार रुपये किमतीची २ तोळ्याची सोन्याची पोत, ३० हजार रुपयांचे सोन्याचे टॉफ्स (५ ग्रॅम), ४५ हजार रुपयांचे सोन्याचे डोरले (३ ग्रॅम) आणि ५ हजार रुपये किमतीची ५ तोळ्याची चांदीची पिंड, असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोराने लंपास केल्याचे उघडकीस आले.

फिर्यादी उषा बांगडकर यांच्या तोंडी रिपोर्टवरून वरोरा पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(a) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश शामराव सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर व्यंकय्याजी मित्तरवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment