Ballarpur Theft Crime Case house burglary scene and police investigation

बल्लारपुरात बंद घराचे कुलूप तोडून पावणेदोन लाखांची घरफोडी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 7, 2026

बल्लारशाह – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घरफोडीची एक अतिशय खळबळजनक घटना (Ballarpur Theft Crime Case) समोर आली आहे. सरदार पटेल वार्डात राहणाऱ्या एका महिला शिपाई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड चोरून नेली. या चोरीमध्ये एकूण १ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाला असून परिसरात घबराट पसरली आहे. (भद्रावती शहरात सुगंधित तंबाखू जप्त)

Ballarpur Theft Crime Case : भरवस्तीत चोरांचा धुमाकूळ

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरदार पटेल वार्डात एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. येथील डब्लू सी एल काटा गेटजवळ राहणाऱ्या ५८ वर्षीय महिला शिपाई मदनम्मा भानूदास येनगूलवार यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. चोरांनी बेडरूमच्या बाजूला असलेल्या खोलीतील लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून तब्बल १,९७,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी बल्लारशाह पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मदनम्मा येनगूलवार या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ५ जुलाई २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्या घरातील कपाटांना लॉक न करता, मुख्य दरवाजाला कुलूप लावून आपल्या मुलीसह बालाजी वार्डात राहणाऱ्या जावेच्या घरी मुक्कामासाठी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास जेव्हा त्या परत आल्या, तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून तोडलेल्या अवस्थेत आढळले. घरात जाऊन पाहिले असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्यांच्या नातवाने या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता कपाटाच्या लॉकरमधून ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची सोन्याची गोफ, २५ हजारांचे सोन्याचे झुमके, २२ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्ट्या आणि १ लाख रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे स्पष्ट झाले. मदनम्मा यांच्या तोंडी तक्रारीवरून बल्लारशाह पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(a), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक बिपीन सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सत्यवान आनंदराव कोटलाके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment