Chandrapur Scented Tobacco Raid Ramnagar Police News34

घरात लपविला होता सुगंधित तंबाखू, रामनगर पोलिसांची धाड

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 9, 2026

चंद्रपूर – (Chandrapur Scented Tobacco Raid) मुळे शहरात बंदी असलेल्या अमली आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात रामनगर पोलिसांनी एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. येथे शासनाने पूर्णपणे बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखूची बेकायदेशीर विक्री सुरू होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या घरावर छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ६७ हजार ७५० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करून ३६ वर्षोय तौफिक करीम भिमानी ला अटक केली. (३ वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलगी घरातून निघाली, पोलिसांनी शोधून काढलं)

Chandrapur Scented Tobacco Raid: रामनगर पोलिसांची अ‍ॅक्शन

चंद्रपूर शहरात शासनाने बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या रॅकेटवर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. रहमतनगर परिसरातील एका घरातून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश झाला असून, कारवाईदरम्यान ६७ हजार ७५० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी ३६ वर्षोय तौफिक करीम भिमानी राहणार नुरी मस्जिद जवळ रहमतनगर ला अटक करण्यात आली आहे.

रामनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शोध पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानंतर संबंधिताच्या घरावर छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान शासनाने विक्रीस बंदी घातलेल्या विविध ब्रँडच्या सुगंधीत तंबाखूच्या पुड्या मोठ्या प्रमाणात सापडल्या. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

आरोग्यास घातक आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची शहरात गुप्तपणे विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अशा प्रकारे अवैध तंबाखूचा साठा करून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, शहरात अशा व्यवसायावर पोलिसांकडून अधिक कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत असून, प्रतिबंधित तंबाखूचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment