Dilip Yadav Suicide Case

चंद्रपुरात खळबळ; पोलिसांवर गंभीर आरोप करत एकाचा अंत!, मृत्यूपूर्वी या पोलिसांचे नाव घेत आरोप

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 17, 2026

चंद्रपूर – Dilip Yadav Suicide Case या अत्यंत धक्कादायक प्रकरणामुळे सध्या चंद्रपूर शहरात आणि पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. “पोलीस मला पैश्यासाठी त्रास देत आहे, खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करीत आहे, मी मोठं पाऊल उचलणार” असा मृत्यूपूर्वी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून रयतवारी कॉलरी येथील ४६ वर्षीय दिलीप यादव यांनी विष प्राशन केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकावर गंभीर छळाचे आरोप लावले आहेत. (तहसीलदारांकडे तक्रार का केली म्हणून, जीवघेणा हल्ला)

Dilip Yadav Suicide Case : मृत्यूपूर्वी बनवला खळबळजनक व्हिडिओ

दोन दिवसांपूर्वी १५ जुलै रोजी शहरातील भिवापूर वार्डात पांडुरंग बाणलवार यांच्या घरी शहर पोलिसांनी छापेमारी करीत तब्बल १ किलो गांजा जप्त केला होता, याप्रकरणी आरोपीला अटक केली, सदर माल हा आरोपी ने दिलीप यादव कडून घेतला असा कबुलीजबाब गुन्हे शोध पथकातील पोलीसानी आरोपीवर दबाव बनविला होता असा थेट आरोप मृतकाच्या कुटुंबीयाने केला आहे.

कुटुंबीयांनी आरोप लावला कि गुन्हे शोध पथकातील रुपेश पराते हा दिलीप यादव ला वारंवार पैश्यासाठी त्रास देत होता, दिलीप म्हणायचा कि भिवापूर गांजा विक्रीत माझा सहभाग असता तर मी कारागृहात जाणारच, मात्र त्या गुन्ह्यात माझा सहभागचं नाही तर मी कशाला घाबरू, आरोपी बाणलवार याला माझे नाव घेण्यास पोलीस बाध्य करीत आहे. आज दुपारी दिलीप यादव ला पोलिसांनी शहर ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. काही वेळात पोलिसांनी त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या जाचाला कंटाळून दिलीप ने थेट पोलीस ठाण्यात विष प्राशन केले असा आरोप यादव कुटुंबीयांनी लावला आहे.

या सर्व प्रकरणावर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी माहिती दिली कि दिलीप यादव वर गांजा विक्री चे गुन्हे दाखल आहे, मृतकाच्या कुटुंबाने पोलीस विभागावर जे आरोप केले ते खोटे आहे, यादव ने पूर्वीच विष प्राशन केले होते, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही मध्ये विष प्राशन करण्याचा कुठलाही प्रकार नाही, मी स्वतः फुटेज ची पाहणी केली आहे. दिलीप यादव पोलीस ठाण्यात उलट्या करू लागल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

दिलीप यादव हा पूर्वी गांजा विक्री करीत होता, वर्ष २०२३ पर्यंत त्यांच्यावर तब्बल १२ गुन्हे दाखल झाले होते. भिवापूर मध्ये झालेल्या गांजा जप्ती कारवाईत यादव चा सहभाग होता कि नाही याचा पोलीस तपास करीतच होते, सध्या दिलीप यादव यांनी गांजा विक्रीचा व्यवसाय ६ महिन्यापूर्वी बंद केल्याचा दावा यादव कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यूपूर्वी दिलीप यादव यांनी एक व्हिडीओ तयार करीत मला पोलीस विभागातील सोनवणे साहबे, रुपेश पराते व भावना मॅडम पैश्यासाठी त्रास देत आहे, मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करीत आहे, मी गुन्हा केलाच नाहीतर कशाला पैसे देऊ, आज मी मोठं पाऊल उचलत आहे जर माझ्या जीवाला बरेवाईट झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस विभागाची राहणार.

पोलिसांच्या जाचाला कंटाळून संशयित आरोपीने आत्महत्या केली असा प्रकार यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात घडला होता, बागला चौकातील एका संशयिताने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २ वर्षांपूर्वी घडली होती, त्यावेळी मृतकाच्या कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment