चंद्रपूर – Chandrapur Gambling चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. चंद्रपूर शहरातील राजकला व अभय टॉकीज चौक परिसरात ‘झेंडी मुंडी’ नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती News34 च्या पाहणीत समोर आली आहे. हा परिसर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यापासून सुमारे २०० ते २५० मीटरवर असल्याचे बातमीत नमूद आहे. येथे ऑनलाईन पद्धतीने पैसे घेतले जात आहे. ‘अवैध धंद्यांना अलिखित परवाना’ या News34 मालिकेच्या पहिल्या भागात याचा आढावा घेतला आहे. (बसमध्ये चढताना महिला शेतकऱ्याची सोन्याची पोत लंपास, वाचा बातमी)
चंद्रपूर जिल्ह्याची धरणं, कोळसा आणि उद्योगांची जमीन आता एका वेगळ्याच गोष्टीसाठी गॅझेटमध्ये चर्चेत आहे. तो विषय आहे—अवैध धंद्यांचे साम्राज्य! जुगार, सट्टा, डिझेल चोरी, गोवंश तस्करी आणि सुगंधित तंबाखूची तस्करी… या काळ्या बाजाराची यादी एवढी मोठी आहे की, सामान्य नागरिकांच्या मनात आता एकच प्रश्न कायम आहे: “हे धंदे चालतात तरी कसे? याची पाळेमुळे कुठे रुजली आहेत?”
Chandrapur Gambling: पोलीस ठाण्यापासून २५० मीटरवर ‘झेंडी मुंडी’
या प्रश्नाचे उत्तर शोधत जेव्हा आपण वास्तवाच्या तळाशी जातो, तेव्हा समोर येते प्रशासन आणि राजकीय पुढार्यांचे अभद्र युतीचे चक्रव्यूह. आज News३४ च्या विशेष क्राइम सिरीज—‘अवैध धंद्यांना अलिखित परवाना’—च्या पहिल्या अंकात आपण प्रवेश करत आहोत चंद्रपूर शहराच्या त्या काळोख्या कोपऱ्यात, जिथे खाकीच्या नाकाखाली लाखोंचा जुगार बिनदिक्कत खेळला जात आहे.
पोलीस ठाण्यापासून अवघ्या २५० मीटरवर सुरू असलेला ‘खेलो इंडिया’ जुगार!, Chandrapur Gambling
स्थळ: चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर—राजकला आणि अभय टॉकीज चौक.
इथे एका बाजूला बाजाराची वर्दळ आहे, तर दुसऱ्या बाजूला सुरू आहे जुगाराचा हाय-व्होल्टेज खेळ ज्याला स्थानिक भाषेत ‘झेंडी मुंडी’ म्हटले जाते. या खेळात १०० रुपयांचे २०० रुपये मिळतात, त्यामुळे तरुणाई आणि गरिबांचे खिसे लुटणारे हे रॅकेट अगदी जोमात आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खेळ सुरू आहे, तिथून या जुगाराचे अंतर अवघे २०० ते २५० मीटर आहे! हा खेळ काही आज सुरू झालेला नाही; मागच्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या नाकाखाली हा अवैध धंद्याचा अड्डा अविरत सुरू आहे.
खाकीची मेहेरनजर आणि संशयास्पद मौन, Chandrapur Gambling
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याची धुरा सध्या पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्याकडून संपूर्ण चंद्रपूरकर एक कठोर कारवाईची अपेक्षा धरून होते. मात्र, त्यांच्याच नाकाखाली चालणाऱ्या या राजरोस खेळाकडे दुर्लक्ष का होत आहे?
तसेच, संपूर्ण जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम मानली जाणारी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) या परिसरावरून कायम ये-जा करत असते. मात्र, त्यांची या धंद्यावर कधीही नजर का पडली नाही? हा प्रश्न आता चंद्रपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात एक मोठे गुढ बनला आहे.
व्हाट्सॲप कॉलवर ‘मंथली हप्ता’?, Chandrapur Gambling
गुन्हेगारी जगतातील सूत्रे किती खोलवर रुजली आहेत, याचा पर्दाफाश करणारी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अवैध धंदे सुरू करण्यासाठी एका पीएसआय (PSI) आणि एका अंमलदारांने थेट अवैध धंदा चालकांशी संपर्क साधला होता. “काम सुरू करा, पण वेळेवर २५ हजार रुपयांचा महिना द्यावा लागेल!” असा फर्मान थेट व्हॉट्सॲप कॉलद्वारे काढण्यात आला होता. यावरून खाकीच्याच काही भ्रष्ट बुरुजांनी या धंद्यांना ‘अलिखित परवाना’ दिल्याचा संशय बळावतो अशी माहिती आहे.
ब्राऊन कापडाआड लाखो रुपयांची उलाढाल, Chandrapur Gambling
राजकला व अभय टॉकीज चौकातील एका पान मंदिराजवळून जेव्हा आपण पुढे जातो, तेव्हा तिथे एक ब्राऊन कापड लावलेले दिसते. कुणाला वाटेल की हे कडक उन्हापासून वाचण्यासाठी असेल, पण सत्य पूर्णपणे वेगळे आहे. त्या कापडाच्या आत सुरू असते ‘झेंडी मुंडी’चा जुगार! आता हिरवं आणि बाहेर ब्राऊन.
- रोजची उलाढाल: लाखोंच्या घरात.
- आधुनिक तंत्रज्ञान: आता या जुगारात केवळ रोख व्यवहार नाही, तर एका टोपलीत पैशांसोबतच चक्क ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले जातात!
- विस्तार: पान ठेला चालकाने हा धंदा सुरू केल्याच्या अवघ्या काही दिवसांतच या सिंडिकेटचा मोठा विस्तार केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना या हाय-टेक जुगाराची पाळेमुळे अगदी चांगलीच ठाऊक आहेत, पण ‘कारवाई’ या शब्दाला त्यांनी जणू आपल्या डिक्शनरीतूनच काढून टाकले आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मोहिमेला हरताळ, Chandrapur Gambling
चंद्रपूर शहर पूर्णपणे गुन्हेगारीमुक्त व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी अवैध धंद्याविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. परंतु, त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना त्यांच्याच हाताखालील खाकी वर्दीतील काही भ्रष्ट कर्मचारी उघडपणे ठेंगा दाखवत आहेत, हेच यावरून सिद्ध होते. अवैध धंद्यांना पाठीशी घालणारे आणि ‘परवानगी’चे रेट ठरवणारे ते वरदहस्त नेमके कुणाचे आहेत? त्यांची नावे आता News३४ च्या हाती लागली आहेत.
“पहिल्या अंकात एवढीच माहिती पुरेशी आहे… कारण गुन्हेगारीच्या या काळ्या साम्राज्याची पाळेमुळे खूप खोलवर आहेत. आता प्रतीक्षा आहे त्या दुसऱ्या अंकाची, जिथे पर्दाफाश होणार आहे एका आणखी मोठ्या आणि खाकीला काळीमा फाडणाऱ्या गुन्ह्याचा!”
— नियमित वाचत राहा: News३४ (चंद्रपूर)
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now








4 thoughts on “चंद्रपूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू आहे ‘झेंडी मुंडी’चा जुगार!, अवैध धंद्यांच्या ‘अलिखित परवान्या’चा पहिला अंक (News३४ विशेष)”