Ballarpur Burglary : बल्लारपूर – शहरातील गौरक्षण वार्डात राहणाऱ्या ३९ वर्षीय रंजिता सिंघाराव यांनी १९ मे रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली कि घरी कुणी नसताना अज्ञात इसमाने प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ९२ हजारांचा ऐवज लांबविला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. (गडचांदूरात सुगंधित तंबाखूवर गुन्हे शाखेची कारवाई)
बल्लारपूरातील गौरक्षण वार्डात दिवसा Ballarpur Burglary घटना
पती नोकरीला बाहेर, शाळेला सुट्ट्या लागल्याने मुलगी काकाकडे राहायला गेली होती, फिर्यादी रंजिता या नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता नोकरीसाठी चंद्रपूरला निघाल्या, रात्री ८ वाजता बसने परत घरी आल्यावर घराच्या दाराचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आधीच अर्धवट उघडा होता. यावेळी रंजिता यांनी शेजाऱ्याला बोलाविले.
आत बेडरूममध्ये बघितले असता आलमारीचे लॉकर मध्ये ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने व रोख ५ हजार असा एकूण २ लाख ९२ हजारांचा ऐवज गायब होता. घरात चोरी झाल्याचे समजताच रंजिता सिंघाराव यांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीवर बीएनएस २०२३ कलम ३०५, ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
