Mul Railway Quarter Theft तोडलेला कुलूपकोंडा आणि कपाटाची तपासणी करणारे पोलीस

मूल येथे रेल्वे कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 14, 2026

मूल: Mul Railway Quarter Theft संदर्भात मूल शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बंद रेल्वे क्वार्टरचा कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले.

पोळा सणाच्या सुट्टीत कुटुंब बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बेडरूममधील कपाट फोडून सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मूल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – भद्रावती पोलिसांची सुगंधित तंबाखूवर कारवाई)

Mul Railway Quarter Theft : भरवस्तीतील शासकीय वसाहतीत धाडसी घरफोडी

मूल शहरात घरफोडीची एक धक्कादायक घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद रेल्वे क्वार्टरचे कुलूप तोडून तब्बल १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. पोळा सणाच्या सुट्ट्यांच्या काळात कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला। याप्रकरणी मूल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोळा सणाच्या सुट्टीत अलोणे कुटुंबीय गेले होते बाहेरगावी

मूळचे मौजा चिरोली येथील रहिवासी असलेले सुदेश पूर्णानंद अलोणे (वय ४० वर्षे) हे रेल्वे विभाग, मूल येथे सेवेत कार्यरत असून, ते पत्नी व मुलासह रेल्वे क्वार्टर क्रमांक ई-२ येथे वास्तव्यास आहेत. मुलाच्या शाळेला पोळा सणाची सुट्टी असल्याने अलोणे कुटुंबीय ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास क्वार्टरच्या मुख्य लोखंडी दरवाजाला कुलूप लावून आधी गावी चिरोली आणि त्यानंतर नातेवाईकांकडे ब्रह्मपुरी येथे गेले होते। दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता क्वार्टरच्या शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्याने सुदेश अलोणे यांना फोन करून त्यांच्या घराचा कुलूप-कोंडा तुटलेला असल्याचे आणि घरात चोरी झाल्याचा संशय असल्याचे कळवले.

माहिती मिळताच अलोणे यांनी ब्रह्मपुरीवरून थेट मूल गाठले असता, घराच्या बेडरूममधील लाकडी कपाट उघडे आणि आतील कपडे अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले। कपाटाची तपासणी केली असता, त्यामध्ये ठेवलेले ६७ हजार ५०० रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, प्रत्येकी २२ हजार ५०० रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची अंगठी व सोन्याच्या बाऱ्या, १३ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची नथ, १३ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या बिऱ्या आणि १० हजार रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण असा एकूण १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास झाल्याचे उघडकीस आले.

या घटनेनंतर सुदेश अलोणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मूल पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५ व ३३१(२) अन्वये घरफोडी आणि चोरीचा गुन्हा नोंदवला गेला आहे। ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून, भरवस्तीतील रेल्वे क्वार्टरमध्ये झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment