Bhadrawati Bike Theft Seizure जप्त केलेल्या दुचाकी आणि भद्रावती पोलीस

भद्रावतीत ६ दुचाकी चोरीचा पर्दाफाश! चोर कोण?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 7, 2026

भद्रावती (चंद्रपूर) : Bhadrawati Bike Theft Seizure प्रकरणी भद्रावती डी.बी. पथकाने मोठी कारवाई केली आहे. शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याकडून चोरीच्या ६ हिरो स्प्लेन्डर मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनांची एकूण किंमत २ लाख २० हजार रुपये आहे. आरोपींवर BNS च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – भंगार व्यावसायिकाने केली घरफोडी)

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात भद्रावती पोलिसांना मोठे यश आले आहे. डी.बी. पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेली पक्की माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई करत एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या एका साथीदार विधिसंघर्ष बालकाच्या मदतीने भद्रावती शहर आणि आजूबाजूच्या परिसरातून विविध ठिकाणांवरून दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन्ही बालकांच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल ६ हिरो स्प्लेन्डर प्लस मोटरसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये MH-34-C-9024 (किंमत ३०,००० रुपये), MH-34-CC-4570 (किंमत ८०,००० रुपये), MH-34-N-2773 (किंमत २०,००० रुपये), MH-34-BL-5130 (किंमत ३०,००० रुपये), MH-34-V-8128 (किंमत ३०,००० रुपये) आणि MH-34-S-8539 (किंमत ३०,००० रुपये) या क्रमांकाच्या दुचाकींचा समावेश आहे. पोलिसांनी जप्तीचा पंचनामा करून एकूण २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा अपराध क्रमांक ७२४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत. ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (चंद्रपूर) संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत भद्रावतीचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, गजानन तुपकर, सहाय्यक फौजदार महेन्द्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे आणि संतोष राठोड यांनी मोलाची भूमिका बजावली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment