Chandrapur Bike Theft Arrest LCB Police Action

चंद्रपूर एलसीबीचा दणका; चार पोलीस ठाण्यांतील गुन्हे एकाच वेळी उघड!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 7, 2026

चंद्रपूर: Chandrapur Bike Theft Arrest कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने दोन अल्पवयीन मुलांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. शहरात चोरीच्या मोटारसायकली विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रामसेतू पुलाजवळ सापळा रचला. संशयास्पद हालचालींवरून दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडण्यात आले. (हे हि वाचा – दारू तस्करी करणाऱ्यावर एलसीबीची धडक कारवाई)

त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे चार विविध पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची उकल झाली आहे.

Chandrapur Bike Theft Arrest : स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) सतर्क झाली असून, चोरीची वाहने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना (अल्पवयीन मुले) ताब्यात घेण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरण्यात आलेल्या तब्बल चार मोटारसायकली हस्तगत केल्या असून, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे.

रामसेतू पुलाजवळ गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन अल्पवयीन मुले चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने शहरात फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ हालचाली करत चंद्रपुरातील रामसेतू पुलाजवळ सापळा रचला. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी या दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून झडती घेतली. प्राथमिक तपासणीत त्यांच्याकडे रामनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १०५७/२०२६ (कलम ३०३(२) भा.न्या.स.) आणि घुग्घुस पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २८०/२०२६ (कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३) या गुन्ह्यांत चोरीला गेलेल्या मोटारसायकली मिळून आल्या.

यानंतर एलसीबी पथकाने जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा धांडोळा घेत तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी या दोन्ही बालकांची अधिक विचारपूस केली असता, त्यांनी भद्रावती पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा क्रमांक ८८४/२०२६ आणि गडचांदूर पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा क्रमांक ४७२/२०२६ या गुन्ह्यांमधील मोटारसायकली देखील चोरल्याची स्पष्ट कबुली दिली. अशा प्रकारे चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरण्यात आलेली चारही वाहने पोलिसांनी जप्त केली असून, या कारवाईमुळे चार महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस हवालदार रजनीकांत पुठ्ठावार, सचिन गुरनुले, सुभाष गोहोकार, पोलीस अंमलदार प्रतिक हेमके, विठ्ठल काकडे, प्रफुल पुप्पलवार आणि पोलीस शिपाई दिनेश अराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment