Chandrapur Bike Thief Arrest स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून आरोपी व जप्त दुचाकी

चंद्रपुरात २.३० लाखांच्या ४ दुचाकी जप्त; ५ गुन्हे उघडकीस!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 11, 2026

चंद्रपूर: Chandrapur Bike Thief Arrest अंतर्गत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोराविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. महाकाली वॉर्डातील सराईत आरोपी प्रतिक धनराज झाडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चंद्रपूर आणि नागपूरमधील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले.

पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांमध्ये ॲक्टिव्हा आणि स्प्लेंडरचा समावेश आहे. आरोपीला पुढील तपासासाठी पडोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. (हे हि वाचा – हद्दपारीचा आदेश, आरोपीने धुळकावला)

Chandrapur Bike Thief Arrest कारवाईत २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर शहर व परिसरातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या सराईत चोराविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने मोठी कारवाई करत एका अट्टल गुन्हेगाराला गजाआड केले आहे. महाकाली वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या प्रतिक धनराज झाडे (वय ३३ वर्षे) या रेकॉर्डवरील संशयित दुचाकी चोराला एलसीबीच्या उपविभाग चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या असून, चंद्रपूरसह नागपूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

चंद्रपूर शहर व परिसरातून दुचाकी लंपास करणाऱ्या सराईताला बेड्या

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर असताना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार संशयित प्रतिक झाडे याला संशयास्पद स्थितीत फिरताना पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-34-BU-5217) तपासली असता, ती पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद होता. यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवून सखोल चौकशी केली असता त्याने इतरही विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या दुचाकी त्याने चंद्रपूर शहरातील दूध डेअरी कॉलनी परिसरातील निर्जन झाडी-जंगलात लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झाडीझुडपांतून पडोलीतून चोरलेली ४० हजार रुपये किमतीची टीव्हीएस मोटारसायकल, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा मोपेड (क्र. MH-34-CA-4413), नागपूर शहरातील बर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवलेली ८० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा मोपेड (क्र. MH-31-FL-7928) तसेच ६० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH-34-AG-6839) असा एकूण २ लाख ३० हजार रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय बल्लारशाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली पॅशन प्रो मोटारसायकल त्याने राजुराजवळील माणिकगड परिसरात बेवारस सोडल्याचे निष्पन्न झाले असून ती गाडी पोलिसांनी आधीच हस्तगत केली आहे.

सराईत आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यास पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी मुद्देमालासह पडोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग चंद्रपूर पथकाने केलेल्या या धडक कामगिरीमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी आपले वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment