Chandrapur Bhatke Vimukt Abhiyan अंतर्गत प्रमाणपत्र वितरण शिबिराचे प्रातिनिधिक छायाचित्र

चंद्रपुरात २७ ते २९ सप्टेंबर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’; आधार, जात प्रमाणपत्रांसह योजनांचा लाभ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 22, 2026

चंद्रपूर : Chandrapur Bhatke Vimukt Abhiyan अंतर्गत जिल्ह्यात विशेष शिबिर राबवले जाणार आहे. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी हे ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ आयोजित करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आधार कार्ड, जात प्रमाणपत्र यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी पात्र नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (चंद्रपुरात डॉल्बी साउंड व प्लाज्मा वर बंदी, वाचा महत्वाची बातमी)

या अभियानांतर्गत महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच विविध योजनांशी संबंधित शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना तसेच मूलभूत हक्कांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

Chandrapur Bhatke Vimukt Abhiyan अंतर्गत कोणती कागदपत्रे मिळणार

अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

शिबिरात कोणत्या शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार

याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत.

शिबिरापूर्वी वस्ती स्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर देण्यात येणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक समन्वय साधण्यात येणार असून शिबिरांचे ठिकाण व वेळ याबाबतची माहिती संबंधित तालुका प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी अभियानात सहभागी होऊन उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment