Chandrapur Family Tragedy : आमदार किशोर जोरगेवार यांनी जीवने कुटुंबाची घेतली सांत्वन भेट

चंद्रपूरच्या बाबूपेठमधील जीवने कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी महामार्ग अपघातानंतर आमदार किशोर जोरगेवार यांची सांत्वन भेट

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 4, 2026

चंद्रपूर – Chandrapur Family Tragedy मुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा शोकमग्न झाला आहे. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात बाबूपेठ येथील जीवने कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि या दुःखाच्या प्रसंगी आपण त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. (बाबुपेठमधील कुटुंबाचा समृद्धी महामार्गावर अपघात)

Chandrapur Family Tragedy : सांत्वनपर भेट

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील जीवने कुटुंबातील पाच सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज जीवने कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन  कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

            यावेळी आमदार जोरगेवार यांनी दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना केली. तसेच या दुःखद प्रसंगात कुटुंबीयांना धीर देत, अशा प्रकारची भरून न येणारी हानी कोणत्याही शब्दांत व्यक्त करता येत नाही. या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत,” असे सांगत त्यांनी कुटुंबीयांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.

 अपघातात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याने बाबूपेठ परिसरासह संपूर्ण चंद्रपूर शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेने प्रत्येकाचे मन हेलावून गेले असून नागरिकांकडूनही जीवने कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment