Chandrapur Police Complaint Box demand by BJP Mahila Aghadi to SP

चंद्रपुरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलीस तक्रारपेटी ठेवा; छेडखानी रोखण्यासाठी भाजप महिला आघाडीची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 6, 2026

चंद्रपूर – जून महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. सध्याची सामाजिक स्थिती पाहता महिला व मुलींच्या छेडखानी, विनयभंग आणि अश्लील हावभाव करण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी (Chandrapur Police Complaint Box) प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये पोलिसांची विशेष तक्रारपेटी ठेवण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजप महिला आघाडीकडून चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (चंद्रपुरातील रामबाग मैदानाची दुरावस्था, खेळाडूंची तक्रार)

Chandrapur Police Complaint Box : शाळा आणि कॉलेजमध्ये बसवणार विशेष पेटी

जून महिन्यात शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरू झालेली आहेत. सध्याची सामाजिक स्थिती बघता महिलांच्या, मुलींच्या बलात्कार, छेडखानी, विनयभंग, मुलींना बघून अश्लील हावभाव करणे, अपशब्द वापरणे, लैंगिक शब्द असलेल्या शिव्या देणे वा मुद्दाम मुलींना बघून असे शब्द असलेले टोमणे मारणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

असे प्रकार घडल्यावर अनेकदा महिला किंवा मुली कोणालाही काही सांगू शकत नाही. अशा गोष्टी सांगणे म्हणजे आपली बदनामी होईल किंवा आपल्यालाच वाईट समजल्या जाणार म्हणून शाळेतील किंवा महाविद्यालयातील शिक्षकांना इतकेच नाही तर घरी सुद्धा असे प्रकार सांगण्यासाठी मुली कचरतात. म्हणून त्यांना आपल्यावर झालेला अन्याय व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या माध्यमातून सर्व शाळा, महाविद्यालयात एक तक्रारपेटी ठेवण्यात यावी अशी मागणी भाजप महिला आघाडी कडून जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या करण्यात आली.

तसेच वेळोवेळी ही तक्रार पेटी उघडल्या जाऊन त्यातील मुलींच्या व महिलांच्या अडचणी,त्यांच्यावर झालेला अन्याय जिल्हा पोलिसांनी समजून या माध्यमातून चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने मुलींमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची एक शक्ती निर्माण होईल. असे निवेदन भाजप महिला आघाडी कडून जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांना देण्यात आले.यावेळी महानगरपालिका सभागृह नेता जयश्री जुमडे, नम्रता आचार्य-ठेमस्कर , नगरसेविका सविता सरकार, महिला शहर अध्यक्ष छबु वैरागडे, माजी नगरसेविका चंद्रकाला सोयाम, आशा आबोजवार, कल्पना बगुलकर, मोनिशा महातव, सीमा धुर्वे, हिना शेख, समिस्ता शेख, रुपाली आंबटकर, ज्योती वेलके यांची उपस्थिती होती.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment