Chandrapur Power Theft Action - चंद्रपूर महावितरण वीजचोरी कारवाई

चंद्रपूर परिमंडळात महावितरणचा वीजचोरांना मोठा झटका; ६७४ वीजचोऱ्या उघड, ७ ग्राहकांवर थेट गुन्हे दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 28, 2026

चंद्रपूर: Chandrapur Power Theft Action अंतर्गत महावितरणने मोठी मोहीम उघडली आहे. चंद्रपूर परिमंडळात बेकायदेशीर वीज वापरणाऱ्यांना महावितरणने चांगलाच दणका दिला. गेल्या पाच महिन्यांत तब्बल ६७४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या ७ ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. (हे हि वाचा – घरगुती दरात गणेशमंडळाना मिळणार वीज जोडणी)

चंद्रपूर परिमंडळात बेकायदेशीरपणे वीज वापरणाऱ्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम उघडली असून वीजचोरांना चांगलाच दणका दिला आहे. गेल्या पाच महिन्यांत राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील तब्बल ६७४ ग्राहकांची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये दंडासह थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या ७ वीज ग्राहकांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीजचोरीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरण तर्फे एप्रिल महिन्यापासून संपूर्ण परिमंडळात व्यापक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील ३१० प्रकरणांमध्ये ५१ लाख ५९ हजार ३१४ रुपयांची, तर गडचिरोली जिल्ह्यातील ३६४ प्रकरणांमध्ये ४८ लाख ७५ हजार ८९५ रुपयांची वीजचोरी निष्पन्न झाली आहे.

दोन्ही जिल्ह्यांतील मिळून एकूण १ कोटी ३५ हजार २०९ रुपयांचे वीजचोरीचे मूल्यांकन करण्यात आले असून संबंधित ग्राहकांनी या रकमेचा भरणा केला आहे. मात्र, निर्धारित मुदतीत दंडात्मक रकमेची पूर्तता न करणाऱ्या ७ ग्राहकांवर पोलिसांत फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत वीज वापरणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा महावितरण प्रशासनाने दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment