रामनगर रिक्षा चोरी प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली रिक्षा

चंद्रपुरात रिक्षा चोरी, रामनगर पोलिसांनी चोराला गाठलंच

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 23, 2026

चंद्रपूर : रामनगर रिक्षा चोरी प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीची तीन चाकी रिक्षा जप्त करण्यात आली. ही कारवाई चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी केली. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद जवळील पेट्रोल पंपासमोरून ही रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितल्यानुसार, गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. महाकाली मंदिर रोड परिसरात त्याला ताब्यात घेतले गेले. (रेल्वेत नोकरीचे आमिष चंद्रपुरातील युवकाची फसवणूक, वाचा बातमी)

चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन चाकी रिक्षा लांबवणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली ८० हजार रुपये किमतीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे रामनगर पोलिसांनी एका गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे.

रामनगर रिक्षा चोरी: १६ ऑक्टोबरला नेमके काय घडले?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत १६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते अकरा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अनिले महादेव गुडे (वय ४५ वर्षे, रा. आंबेडकर नगर, बाबूपेठ, चंद्रपूर) यांनी आपली मालकी three-wheeler रिक्षा क्रमांक (एम.एच. ३४ डी. ६९६३) ही जिल्हा परिषद जवळील पेट्रोल पंपासमोर उभी केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने संधी साधत ही रिक्षा लांबवली. याप्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिेतेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर काककडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रामनगर पोलिसांचे शोध पथक या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, चोरीला गेलेली ती रिक्षा पालीवाल हॉस्पिटल, महाकाली मंदिर रोड परिसरात एका संशयित व्यक्तीकडे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने धाव घेत संबंधित ठिकाण गाठले आणि संशयित इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाकीतील हिसक्यापुढे त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, शेख गफार रज्जाक शेख (वय ३५ वर्षे, रा. दुर्गानगर, ता.जि. चंद्रपूर) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरलेली ८० हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त केली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस त्या दृष्टीने कसून चौकशी करत आहेत.

ही यशस्वी कारवाई रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, आणि शोध पथकातील पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांच्या, तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपुरात रिक्षा चोरी, रामनगर पोलिसांनी चोराला गाठलंच”

Leave a Comment