Chandrapur Travels Drug Inspection by Ramnagar Police

चंद्रपुरात नागपूर-हैदराबाद ट्रॅव्हल्सवर पोलिसांची धडक कारवाई; श्वानपथकासह बसची झाडाझडती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 26, 2026

चंद्रपूर: Chandrapur Travels Drug Inspection मोहिमेअंतर्गत रामनगर पोलिसांनी नागपूर-हैदराबाद मार्गावर धावणाऱ्या खाजगी बसवर धडक कारवाई केली. २५ जुलै रोजी अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष गुन्हे शोध पथकाने स्निफर डॉग्सच्या मदतीने ट्रॅव्हल्सची बारकाईने झाडाझडती घेतली. या कारवाईमुळे शहर व परिसरात बेकायदेशीर तस्करांचे धाबे दणाणले आहेत. (व्हाट्सअप वर लिंक ओपन करताच उडाले ३ लाख रुपये)

रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना नागपूर-हैदराबाद मार्गावर धावणाऱ्या डी.एन.आर. ट्रॅव्हल्स नावाच्या बसमधून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने या माहितीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अवगत केले आणि कारवाईसाठी आवश्यक मंजुरी प्राप्त केली. यानंतर पोलीस निरीक्षक एकुरके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी, शासकीय पंच, छायाचित्रकार आणि अंमली पदार्थांची तात्काळ ओळख पटवण्यासाठी तैनात असलेले दोन प्रशिक्षित श्वान यांच्यासह विशेष पथक कारवाईसाठी रवाना झाले.

स्निफर डॉग्सच्या मदतीने ट्रॅव्हल्सची बारकाईने झाडाझडती

सदर ट्रॅव्हल्स चंद्रपूर हद्दीत दाखल होताच पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पंचांसमक्ष आणि श्वानांच्या मदतीने गाडीची कसून झाडाझडती घेतली. वाहनाच्या कानाकोपऱ्याची बारकाईने तपासणी करण्यात आली. तथापि, गुप्त माहितीनुसार वाहनात कोणताही संशयास्पद माल किंवा अंमली पदार्थ आढळून आले नाहीत. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पुढील नोंद केली आहे.

दरम्यान, या धडक मोहिमेनंतर रामनगर पोलिसांनी अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक इशारा दिला आहे. आंतरजिल्हा तसेच आंतरराज्यीय मार्गांवर धावणाऱ्या सर्व खासगी ट्रॅव्हल्स आणि संशयित वाहनांवर यापुढे पोलिसांचे बारीक लक्ष असणार असून, अशी कोणतीही बेकायदेशीर वाहतूक आढळल्यास कठोर कारवाई करण्याची तजवीज करण्यात आली आहे. नागरिकांना किंवा प्रवाशांना अशा प्रकारच्या अवैध किंवा संशयास्पद हालचालींबाबत काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी निसंकोचपणे रामनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, सहाय्यक फौजदार प्रकाश बल्बी, पोलीस अंमलदार आनंद खरात, बाबा नैताम, रामप्रसाद नैताम, जितेंद्र आकरे, रवी ढेंगळे, मनीषा मोरे, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे आणि ब्यूटी साखरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment