जिवती अवैध दारू प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेल्या देशी दारूच्या बाटल्या

जिवतीत ३०० देशी दारू बाटल्या जप्त; ड्राय डेला कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 23, 2026

जिवती: जिवती अवैध दारू विक्रीप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ड्राय डेच्या दिवशी विक्रीसाठी ठेवलेली १३ हजार ५०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहितीवरून ही कारवाई झाली. राजुरा-गडचांदूर उपविभागीय पथकाने जिवती परिसरात कारवाई केली. पथकाने ९० मिली क्षमतेच्या ३०० बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी जिवती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. (अवैध वाळू तस्करी महसूल विभागाने केली कारवाई, वाचा हि बातमी)

जिवती अवैध दारू: ड्राय डेला पोलिसांनी काय जप्त केले?

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे ‘ड्राय डे’च्या दिवशी शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैध रित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध जिवती पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल साडेतेरा हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त केली असून, या घटनेमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिनांक २३ ऑक्टोबर रोजी जिवती येथे ड्राय डे निमित्त दारू विक्री बंदी असतानाही मौजा जिवती परिसरात अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती राजुरा-गडचांदूर उपविभागीय पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ जिवती परिसरात सापळा रचून कारवाई केली. गस्तीदरम्यान पोलिसांनी पंचांसमक्ष एका इसमाची कसून तपासणी केली असता, त्याच्याकडे विनापरवाना व बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठवून ठेवलेली दारू आढळून आली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ९० मिली क्षमतेच्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या एकूण ३०० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या या दारूची एकूण किंमत १३ हजार ५०० रुपये असून संपूर्ण मुद्देमाल पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चंद्रकांत शेषराव फुकटवाड (वय २५ वर्षे, रा. धोंडाअर्जुनी, ता. जिवती, जि. चंद्रपूर) असे नाव असलेल्या आरोपीविरुद्ध जिवती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १८८/२३, महाराष्ट्र दारूबंदी कायदा (मदाका) कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राजुरा-गडचांदूर उपविभागाच्या पथकाद्वारे ही कारवाई पार पाडण्यात आली असून, परिसरामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment