Nagbhid Suicide Case Mindala Well Police Investigation

सासुरवाडीत जावयाने केली आत्महत्या

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 4, 2026

नागभीड (चंद्रपूर) : Nagbhid Suicide Case अंतर्गत नागभीड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सासुरवाडीला आलेल्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

मिंडाळा येथील शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. मृतक तरुण हा ब्रह्मपुरी तालुक्यातील रहिवासी होता. तो दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. नागभीड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (हे हि वाचा – नोकरीच्या आमिषाने ६ लाखाची फसवणूक)

भावाला राखी बांधण्यासाठी पत्नीसह सासूरवाडीला आलेल्या जावयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) दुपारी मिंडाळा येथे उघडकीस आली. विकास कालिदास सहारे (वय ३०, रा. मुडझा, ता. ब्रह्मपुरी) असे मृतकाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विकास सहारे हा रक्षाबंधनानिमित्त पत्नीसोबत नागभीड तालुक्यातील वासाळा मेंढा येथील सासूरवाडीस आला होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास तो कोणालाही काही न सांगता घरातून अचानक निघून गेला. बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्याची शोधमोहीम सुरू केली. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.

जावई बेपत्ता झाल्याने चिंताग्रस्त झालेल्या सासऱ्यांनी गुरुवारी (दि. ३) नागभीड पोलिस ठाणे, नागभीड येथे तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच, शुक्रवारी (दि. ४) दुपारी मिंडाळा येथील एका विहिरीत विकासचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्याच्या आत्महत्येच्या कारणांचा पोलिस तपास करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment