Gudi Padwa । चंद्रपुरात गुढीपाडव्याचा असा सोहळा तुम्ही कधीच पाहिला नसेल; शिवरायांच्या पुतळ्याबाबत मोठी घोषणा!

March 19, 2026 by Prakash Hande

Gudi Padwa 2026 : चंद्रपूर - गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचापरंपरेचा आणि नवचैतन्याचा सण आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपण आनंदउत्साह आणि सकारात्मकतेने करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रेरित हा गुढीपाडव्याचा सण आपल्या शौर्यस्वाभिमान आणि संस्कृतीचे प्रतीक असून गुढी उभारून आपण विजयसमृद्धी आणि नव्या आशांचा संदेश देत असतोअसे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (विधानसभा गाजवली, आता विकास गाजतोय)

 

हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा उत्सव यंदाही चंद्रपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गुढी उभारून उपस्थित नागरिकांना घुगरी वाटप करण्यात आले. यावेळी ब्रह्मास्त्र ढोल-ताशा पथकांनी कार्यक्रमात रंगत भरली. तसेच जगनगुरु व्यायामशाळेच्या वतीने कुस्ती आणि लाठी-काठीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने या अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी महापौर संगीता खांडेकरपरमपूज्य मनीष महाराजभारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिरमनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टीज्येष्ठ नेते राजेंद्र खांडेकरतुषार सोमबलराम डोडानीमहामंत्री रवी गुरनुलेवंदनाताई हातगावकरविनोद शेरकीनगरसेवक सुभाष कासनगोट्टूवारभालचंद्र दानवआशिष मासीरकरगणेश पिंपळकरनगरसेविका शीतल गुरुनुलेअॅड. सारिका संदुरकरअनुजा तायडेआशा देशमुखमहिला महामंत्री सायली येरणेविमल कातकरस्वप्निल डुकरेरामकुमार आकापेल्लीराकेश नाकाडेप्रवीण गिलबिलेमंगेश अहिरकरसतीश तायडेसुमित बेलेराजेश मोरपाकानकुल वासमवारप्रतीक शिवणकरसंजय महाकाले, ईश्वर विरूटकर, कल्पना शिंदे ईश्वर वाघमारे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Marathi New Year

 

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार पुढे म्हणाले कीआज येथे मोठ्या जल्लोषात साजरा होत असलेला हा उत्सव आपल्या चंद्रपूरच्या एकतेचे आणि संस्कृतीप्रेमाचे द्योतक आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षी हा सोहळा साजरा केला जात आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एकोपा वाढतोतरुण पिढीला आपल्या परंपरांची ओळख होते आणि आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो.

 

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आपण कटिबद्ध राहून एक सक्षमसशक्त आणि समृद्ध चंद्रपूर घडविणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात प्रजेचे राज्य होते. त्यांच्या विचारांतून समाजाला नेहमी प्रेरणा मिळत राहावीयासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा आपण संकल्प केला असून त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

 

आज कलाकारांनी आपली पारंपरिक कला सादर करून गुढीपाडव्याला एक वेगळीच शोभा आणली आहे. अशा कला आणि परंपरांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

Leave a Comment

+