शिवरायांच्या अपमानावरून भाजप रस्त्यावर; हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गांधी चौकात भाजपचे निषेध आंदोलन

February 16, 2026 by Prakash Hande

Chandrapur BJP protest against Sapkal : चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौकचंद्रपूर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. (मनपाच्या शाळेत प्रवेश घ्या, मालमत्ता कर माफ होणार, खासदारांची मागणी)

 

            आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात यावेळी चंद्रपूर शहर महानगर माजी अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारप्रदेश कार्यकारणी निमंत्रीत सदस्य तषार सोममनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टीरवी गुरुनुलेमहामंत्री नामदेव डाहुलेमहामंत्री श्याम कनकमबलराम डोडाणीविधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकरदशरथसिंह ठाकूरमंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरेदिनकर सोमलकरनगर सेविका शितल गुरुनुलेज्याती जिवनेसरला कुळसंगेअॅड सारिका संदुरकरआशा देशमूखमनपा नगर सेवक भालचंद्र दानवनितेश गवळी,  जितेश कुळमेथेमहिला महामंत्री सायली येरणेघुग्घुस नगर सेवक आशिष मासिरकरउमेश आयलुप्रज्ञा बोरगमवारमंजुश्री कासनगोट्टूवारप्रविण गिलबिलेशशिकांत मस्केचंद्रशेखर देशमूखकरणसिंह बैसदिपक पाठकअभिनव कोरकोपुलवारअंकुश मडावीअनिष दिक्षितदेवा कुंटाआशु फुलझेलेरेश्मा पांडेतसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत सकपाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला.

 

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानधर्मरक्षण आणि रयतेचे लोकाभिमुख राज्य उभे केले. अशा युगपुरुषाची तुलना परकीय आक्रमक प्रवृत्तीच्या शासकाशी करणेही महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात करणारी आणि इतिहासाचा अवमान करणारी बाब आहे. महाराष्ट्रातील जनतेला हा अपमान कदापि मान्य नाही असे ते यावेळी म्हणाले. 

Leave a Comment

+