Chandrapur Crime Branch Update : चंद्रपूर - गोवंश जनावरांना कत्तलीसाठी नेत असलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेने प्रहार केला असून चंद्रपुरात ५ आरोपींवर गुन्हा दाखल करीत २७ जनावरांसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (पैश्यासाठी मामाने भाचा व सुनेला झोडपले)
१२ एप्रिलला चंद्रपूर शहरात गुन्हे शाखेचे पथक गस्त करीत असताना गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पडोली ते घुग्गुस मार्गावरील खुटाळा येथे गुन्हे शाखेने सापळा रचला.
यावेळी ट्र्क क्रमांक AP ०७ TU ३४९९ ला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये २७ जनावरे आढळली, सर्व जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत होते. याप्रकरणी एकाला अटक तर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये २२ वर्षीय दानिश अब्दुल हमीद कुरेशी राहणार व्याहाड खुर्द सावली, तेलंगणा राज्यातील समीर उर्फ सोहेल, गडचांदूरातील सादिक कुरेशी, राजुऱ्यातील समीर खान मूसावीर खान, कागजनगर मधील अजीम उर्फ अजु शेख यांचा समावेश आहे.
२७ जनावरे, एक ट्र्क व चारचाकी वाहनासह पोलिसांनी एकूण ३१ लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला, सुरक्षेच्या दृष्टीने २७ जनावरे प्यार फाउंडेशन मध्ये जमा करण्यात आले. आरोपींवर पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असम पुढील तपास पोलीस करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, सुमित बरडे व कार्तिक खनके आणि राहुल पोंदे यांनी केली.
Leave a Comment