Illegal Sand Mining : ब्रह्मपुरी (चंद्रपूर) - ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलधोकडा नदीतून विना परवाना रेतीचे अवैध रेती चोरताना ३ ट्रॅक्टर जप्त करीत एकूण १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (मजुरी मागायला गेला, ठेकेदाराने दांडक्याने मारले, मजुराचा मृत्यू)
१३ एप्रिल रोजी मध्यरात्री गस्तीवर असताना पोलिसांना ११२ या आपत्कालीन क्रमांकावरून अवैध रेती चोरी बाबत माहिती दिली, माहिती मिळताच पोलीस मौजा अरहेर नवरगाव मध्ये पोहोचले त्याठिकाणी ३ ट्रॅक्टर व चालक यांना स्थानिक नागरिकांनी पकडून ठेवले होते.
पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक MH३४ CD ९६५५, MH ३४ CD ०९९१ व क्रमांक नसलेला ट्रॅक्टर त्यामध्ये ३ ब्रास रेती पोलिसांनी जप्त करीत चालक कृष्णकांत गोवर्धन देवढगले, यश प्रभू बांडे व साहिल कृष्णलाल बरडे यांची विचारपूस केली असता ते म्हणाले कि आम्हाला आमचे मालक विलास विखार, मोंटू सहारे, कृष्णलाल सहारे यांच्या सांगण्यावरून आम्ही रेती आणली.
पोलिसांनी या ६ आरोपीवर कलम ३०३ (२), ३ (५) व ४९ अनव्ये गुन्हा दाखल करीत एकूण १५ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला, सदरची कारवाई पोउपनि बालाजी चव्हाण व चेतन गोवर्धन यांनी केली. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.
Leave a Comment