Murder Near Police Station : चंद्रपूर - 14 एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सुरु असताना गांधी चौकात डीजेच्या तालावर नाचताना धक्काबुक्की झाल्याने 5 युवकांनी मिळून एकाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. य प्रकरणी गुन्हे शाखेने ६ आरोपीना अटक केली आहे. शहर पोलीस स्टेशनच्या १०० मीटर अंतरावर हा खुनी संघर्ष घडल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (आंबेडकर जयंती रॅलीत युवकाची निर्घृणपणे हत्या)
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सायंकाळ पासून शहरातील विविध विहारातून भव्य रॅली काढण्यात आली होती, बाबासाहेबाना मानवंदना देण्यासाठी हजारो अनुयायी रॅलीमध्ये सामील झाले होते.
रात्री 11.30 वाजता इंदिरा नगर मधील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्था तर्फे गांधी चौकात रॅली पोहोचली, यावेळी डीजेच्या संगितावर काही युवक नाचायला आले, हे युवक रॅलीत शिरून नाचू लागले, यापैकी एकाचा अनिकेत गलबले याच्या कोणीला स्पर्श झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. नागरिकांनी त्यांना खडसावले मात्र युवक हे काही ऐकण्याच्या व स्वतःची चुकी मानायला तयार नसल्याने नागरिकांनी त्याला चोपण्यास सुरुवात केली.
यावेळी मार खात असलेल्या युवकाच्या भावाला हि बाब कळताच ते ३ ते ४ जण त्या घोळक्यात शिरून गोंधळ करू लागले, यावेळी भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्थेचे सदस्य रविकांत टेम्भूरकर हे वाद सोडविण्यासाठी पोहोचले मात्र त्यापैकी एकाने रविकांत व त्याचा मित्र अनिकेत वर चाकूने वार केला, रविकांत च्या छातीत तर अनिकेत च्या डोळ्यावर व पाठीवर गंभीर इजा झाली. रविकांत रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्याचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. हल्लेखोर आरोपी युवकाला नागरिकांनी पकडत चांगलेच बदडत पोलिसांच्या स्वाधीन केले.
गांधी चौक परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली, स्थानिक गुन्हे शाखेने मोर्चा सांभाळत उर्वरित ४ आरोपीना ताब्यात घेतले, एकूण ६ आरोपीपैकी २ आरोपी हे अल्पवयीन असून यामध्ये २ भावंडांचा समावेश आहे. रविकांत टेम्भूरकर हा युवक इंदिरानगर बॉंबे प्लॉटजवळ राहणारा होता, नेहमी समाजाच्या कार्यासाठी तो तत्पर होता, चंद्रपूर शहरात प्रथमच बाबासाहेब यांच्या जयंती उत्साहात गालबोट लागल्याची घटना घडली असून रॅली मध्ये सामील युवक चाकू घेऊन फिरत असल्याची गंभीर बाब या निमित्ताने समोर आली आहे. Police Security Failure
विशेष बाब म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतो, गांधी चौक ते आंबेडकर पुतळा या दरम्यान पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात, शहर पोलीस स्टेशन व घटनास्थळ मध्ये केवळ १०० मीटरचे अंतर आहे, त्यानंतरही या मिरवणुकीत घडलेले हत्याकांड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.
Leave a Comment