Private School Loot । साध्या वह्या-पुस्तकांसाठी १० पट जादा पैसे? चंद्रपुरातील शाळांची मोठी मक्तेदारी थांबणार

April 15, 2026 by Prakash Hande

Private School Loot : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश खासगी शाळा पालकांना लुटण्याचे काम करीत आहे, नवीन शैक्षणिक वर्षाचे निमित्त साधत खासगी शाळा शैक्षणिक साहित्य, पुस्तके, गणवेश ठराविक दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करीत आहे, प्रशासनाने यावर कठोर नियंत्रणात्मक पाऊल उचलावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा यंग ब्रिगेड कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सौरभ ठोंबरे यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी पंत यांच्याकडे केली आहे. (गांधी चौकात हत्या, वाद सोडवायला गेलेल्या युवकावर चाकूने वार)

 

शाळेचे नवे सत्र सुरु झाल्यावर खासगी शैक्षणिक संस्था मक्तेदारी करीत पालकांना महाग दारात शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडत आहे, बाजारातील दर्जेदार वस्तूपेक्षा शाळेतील साहित्य १० पटीने महाग असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मध्यमवर्गीय पालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून मुलांना शिकवायचे कि नाही असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

 

या गंभीर मागणीकडे यंग ब्रिगेड कांग्रेस पक्षाने प्रशासनाचे लक्ष वेधत जिल्हा प्रशासनाने पालकांच्या या समस्येवर तातडीने हस्तक्षेप करावा व जिल्ह्यातील शाळा व दुकानांवर लक्ष ठेवत शिक्षण व महसूल विभागाचे विशेष भरारी पथक स्थापन करीत यावर कारवाई करावी.

 

प्रशासनाने यावर कठोर पाऊले उचलली तर अश्या अनिष्ट प्रथेवर लगाम घालणे सोपे होणार व पालकांची आर्थिक लूट यामाध्यमातून थांबणार अश्या मागणीचे निवेदन यंग ब्रिगेड कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौरभ ठोंबरे यांनी जिल्हाधिकारी पंत यांना दिले आहे.

Leave a Comment

+