Chandrapur Police Crime Update : चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत मोटारसायकल चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. 3 एप्रिल 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याजवळून सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (भाड्याच्या घरात सुरु होती गांजा विक्री?)
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून MH 34 AU 8490 क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल तसेच सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. यामध्ये अपराध क्रमांक 397/26 अंतर्गत मोटारसायकल चोरीचा गुन्हा तसेच अपराध क्रमांक 392/26 अंतर्गत घरफोडी चोरीचा गुन्हा समाविष्ट आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे तनवीर कदीर बॅग (वय 26) आणि शिवम उर्फ कट्ट्या अनिल कुडकेलवार (वय 26) अशी असून दोघेही गंगाराम वॉर्ड, चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे, दोन्ही आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.
Leave a Comment