चंद्रपुरात सत्तेचा पेच! दिल्लीत तोडगा निघूनही वाद शमेना, हायकोर्टात याचिका दाखल

February 04, 2026 by Prakash Hande

Chandrapur Political News Live : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेच्या गटनेता व महापौर पदावरून सुरु झालेला वाद शमण्याचे नाव घेत नाही आहे, दिल्लीत बैठक झाली तोडगा निघाला मात्र तसे काही झाले नाही, आज वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी थेट विभागीय आयुक्तविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका टाकली आहे, गट नोंदणी प्रक्रियेत अडथळा व कर्तव्यात कसूर याविरुद्ध वडेट्टीवार गट आक्रमक झाला असून न्याय मिळाला नाहीतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. नेमकं काय घडलं दिल्लीतील बैठकीत जाणून घ्या. (चंद्रपुरात शिवसेनेचा पाठिंबा कुणाला? संजय राऊतांनी थेट सांगितलं

चंद्रपूर महापालिकेच्या घडामोडींवर रोज अपडेट देणारे आणि महापौर आमचाच होईल असा दावा करणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र आज दिल्लीत झालेल्या बैठक आणि त्यात ठरलेल्या निर्णयावर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे दिल्लीच्या फॉर्म्युलावरून ते नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूरच्या महापौरपदावरून सुरू झालेल्या वादाचा तोडगा काढण्यासाठी वडेट्टीवार आपल्या १८ समर्थक नगरसेवकांना दिल्लीत घेऊन गेले होते. ते आज सर्व नागपूरमध्ये परतले. यानंतर वडेट्टीवारांनी आपल्याला या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला. नंतर बोलू असे त्यांच्यावतीने कळवण्यात आले. 

हे बघता वडेट्टीवार दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयावर समाधानी नसल्याचे दिसून येते. चंद्रपूर महापालिकेचे महापौरपद आपल्या समर्थकाला देण्यासाठी अडून बसलेल्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना दिल्लीतील बड्या नेत्यांनी मोठा झटका दिला. उपमहापौरपद देऊन त्यांची बोळवण केली तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौरपद देण्यास बजावले आहे. सत्तास्थापनेसाठी उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना चंद्रपूरमध्ये सोबत घेण्यात येणार आहे. त्यांना महापालिकेत अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी स्थायी समिती देण्यात येणार आहे. यावरून दिल्लीत वजन कुणाचे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दुसरीकडे दिल्लीपर्यंत वाद घेऊन जाणाऱ्या आणि आपल्याच पक्षातील नेत्यांच्या विरोधात उभे राहणारे वडेट्टीवार तोंडघशी पडले आहेत.


चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल लागतात काँग्रेस नेत्यांमध्ये श्रेयवादाला सुरुवात झाली होती. विजय वडेट्टीवारांनी आपले सर्वाधिक समर्थक निवडून आल्याचा दावा केला होता. काही नगरसेवकांना त्यांनी तातडीने नागपूरला हलवले होते. त्यावरून खासदार प्रतिभा धानोरकर चांगल्याच चिडल्या. काँग्रेसच्या नगरसेवकांना उचलण्याचे कारण काय असा जाब त्यांनी वडेट्टीवारांना विचारला होता. वडेट्टीवारांचा चंद्रपूर महापालिकेशी संबंध नाही. ते चंद्रपूरचे रहिवासी नाहीत. असे असताना गरजेपेक्षा जास्त ते चंद्रपूर शहरात लुडबूड करीत असल्याचा आरोपही धानोरकर यांनी केला होता. यानंतर वडेट्टीवारांनी खासदार स्वतःला पक्षाच्या मालक समजतात असे वक्तव्य केले होते. Chandrapur Political News Live

त्यावरून दोन्ही नेत्यांमधील शा‍ब्दिक वादात आणखीच भर पडली होती. शेवटी धानोरकर यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन नागपूरला आल्या. विभागीय आयुक्तांकडे परस्पर गटनोंदणी केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. शेवटी प्रदेशाध्यक्ष यांना या वादात मध्यस्थी करावी लागली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खासदारांच्या समर्थकाला महापौर तर स्थायी समिती वडेट्टीवारांच्या गटाला देण्याच्या सूचना देऊन या वादावर तोडगा काढला होता. तो दोन्ही नेत्यांनी मान्य केला होता. असे असले तरी वडेट्टीवारांची नाराजी कायम होती. ती त्यांनी बोलूनसुद्धा दाखवली होती. मध्यंतरी काही नगरसेवकांना धमक्या देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली. त्यात वडेट्टीवारांनी १८ नगरसेवकांचा गटाची वेगळी नोंद केली मात्र ती नोंद अद्यापही विभागीय आयुक्त कार्यालयात झाली नाही. सर्वाधिक नगरसेवक आपल्याकडे आहेत. काँग्रेसचा गटनेता आपलाच होणार असा दावाही त्यांनी केला होता.

वडेट्टीवार गट यावर काय म्हणतो?

दिल्लीतील बैठकीत जे घडलं ज्या बातम्या बाहेर आल्या त्या सर्व खोट्या होत्या, अशी काही बोलणी झाली नाही, आम्ही गटनेता मागितला मात्र तो आम्हाला देण्यात आला नाही, वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी दंड थोपटत विभागीय आयुक्त बिदरी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, विभागीय आयुक्तांना आम्ही रीतसर अर्ज केला, त्यांचं काम होत कि कागदपत्रांची छाननी करीत गटाची नोंदणी करणे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित होते मात्र त्यांनी तसे काही केले नाही त्यावर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, जर या याचिकेवर आम्हाला न्याय मिळाला नाहीतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. वडेट्टीवार गटाकडे नगरसेवकांची संख्या जास्त आहे त्यामुळे गटनेता आमचा व्हावा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

धानोरकर गटाचे यावर काय म्हणणे आहे?

धानोरकर गट म्हणतो कि दिल्लीच्या बैठकीत जो निर्णय झाला तो सर्वानी मान्य करायला हवा, मात्र बैठकीत सर्व मान्य असल्याचे दाखवायचे आणि परतल्यावर गटनोंदणी बाबत आक्षेप घेत विभागीय आयुक्तांच्या विरोधात याचिका टाकणे हे सर्व केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देण्याचे काम आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून होत आहे, ते पूर्णतः चुकीचे असून पक्षश्रेष्ठींने जो निर्णय दिला त्यावर एकत्र येत महापौर पदासाठी सत्तेची गणित जुळवायला हवे.

Leave a Comment

+