Cow Smuggling । तस्करांच्या मार्गात 'अडसर' ठरले चंद्रपूर पोलीस; गुन्हे शाखेच्या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले!

April 07, 2026 by Prakash Hande

Cow Smuggling News : चंद्रपूर - तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातून कत्तलीकरिता गोवंशाची वाहतूक करणे तस्करांना सोपा मार्ग आहे, मात्र त्यांच्या मार्गात नेहमी चंद्रपूर पोलीस अडसर ठरतात. असाच एक प्रयत्न ७ एप्रिल रोजी करण्यात आला मात्र गुन्हे शाखेच्या सतर्कतेने तस्करांचा प्रयत्न फसला. (मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरणात एकाला अटक)

 

अवैध धंद्यावर रेड करणेकरीता गुन्हे शाखेतील पथक गस्तीवर असताना चंद्रपूर शहर परिसरातून गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे एमईएल नाक्यावर सापळा रचला, यावेळी तस्करांनी पायलटिंग वाहनाचा वापर केला.

 

पायलटिंग वाहन क्रमांक टीएस ०४ ईयू ५६२५ येत असताना पोलिसांनी वाहनाला थांबविले, पायलटिंग वाहनाच्या मागे दोन ट्र्क आले, पोलिसांनी धरपकड सुरु केली असता एका ट्र्क मधील आरोपी पळाले. पोलिसांनी यावेळी ५ जणांना अटक केली. वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये ६३ जनावरे आढळून आली.

 

पोलिसांनी जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना प्यार फाउंडेशन मध्ये पाठविले. या प्रकरणी २७ वर्षीय शेख हाशम शेख मोला, तेलंगणा राज्यातील आसिफाबाद मधील २९ वर्षीय मोसीन बेग मुबारक बेग, झारखंड राज्यातील ३० वर्षीय शेख अन्सारी अशरफ मिया, गडचांदूरातील १८ वर्षीय समीर खान करीब खान, गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील १९ वर्षीय शेख जुनेद साबीर हुसेन, इम्रान कुरेशी, सादिक कुरेशी, आवेश कुरेशी तिघे राहणार गडचांदूर, सोहेल राहणार राजुरा, चंद्रपुरातील वसीम कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी जनावरे व वाहने असा एकूण ५८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur Police Action

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, नितीन कुरेकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, प्रमोद कोटनाके, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, प्रसाद धुलगंडे व सायबर पोलीस कार्तिक खनके आणि उमेश रोडे यांनी केली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.              

Leave a Comment

+