राजुऱ्यात वाळू तस्करांचा माज! महिला वनरक्षकाला दिली जीवे मारण्याची धमकी

March 01, 2026 by Prakash Hande

Forest Guard Assault : राजुरा - अवैध वाळू तस्कर यांच्या मुजोरीपणाचे उदाहरण राजुरा तालुक्यात समोर आले आहे, महिला वनरक्षकाला बघून घेण्याची धकमी देत वाळू तस्करांनी वाहन सोबत नेत पळ काढल्याची घटना २८ फेब्रुवारीला रात्री दीड वाजता घडली. महिला वनरक्षक मीनाक्षी सातपुते ह्या सुमठाना सह बोडगाव जंगल परिसरात रात्र गस्त करीत असताना हि घटना घडली. (चंद्रपूर पोलिसांनी गुन्हेगारांचा माज उतरविला, थेट मकोका अंतर्गत कारवाई)

 

वनरक्षक सातपुते ह्या आपल्या कर्मचाऱ्यांसह रात्र गस्तीवर असताना वाघोबा मंदिर परिसराकडे ट्रॅक्टरचा आवाज आल्याने त्यांनी त्याठिकाणी जाऊन बघितले असता तिथे नंबर नसलेला लाल रंगाचा ट्रॅक्टर दिसला, त्यामध्ये काहीजण रेती भरत होते. तुमच्याकडे रेती नेण्याचा परवाना आहे का असे विचारले असता त्यांनी नाही म्हटले.

 

ट्रॅक्टर चालकाचे सुनील कोटरंगे यांनी ट्रॅक्टरची चावी सातपुते यांना दिली, ट्रॅक्टर मालकास त्यांनी फोन लावला असता ट्रॅक्टर मालक देविदास येवले, व त्याचा मुलगा कुणाल येवले सोमनाथपुरा वॉर्ड त्याठिकाणी आले. ट्रॅक्टर मालकाने चावी मागितली, चावी न दिल्याने देविदास येवले यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तुम्हाला जी तक्रार करायची ते करा ट्रॅक्टर आम्हाला घेऊन जाऊ द्या, जर ट्रॅक्टर च्या पुढे तुमच्यापैकी कुणी आले तर तुमच्या अंगावरून ट्रॅक्टर नेणार अशी धमकी वनरक्षक सातपुते यांना दिली.

 

अवैध वाळू उपसा करीत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर धमकी व दडपशाही करीत ट्रॅक्टर मालक व त्याचा मुलगा यांनी वाहन डायरेक्ट करीत ट्रॅक्टर घेऊन गेले, याबाबत वनरक्षक मीनाक्षी सातपुते यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये येवले पिता-पुत्रविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुनील कोटरंगे, देविदास येवले व कुणाल देविदास येवले विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७, २६ (१), बीएनएस ३५२, ३५१ (२), ३०३ (२), १३२, १२१ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.    

Leave a Comment

+