Nagbhid Labor Murder । कष्टाचे पैसे मागणं पडलं महागात! ठेकेदाराच्या मारहाणीत मजुराचा दुर्दैवी अंत

April 13, 2026 by Prakash Hande

Nagbhid Labor Murder Case : चंद्रपूर - जिल्ह्यातील नागभीड येथे मजुरीचे पैसे मागण्यावरून झालेल्या वादात ठेकेदाराच्या मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि. ९) झालेल्या वादात मंगेश अरुण सेलोटे (रा. म्हसली) याने मजूर यशुदास माणिक चुधरी (वय ४०) याला मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. (मजुरीचे पैसे मागितले, ठेकेदाराने लाकडी दांडक्याने केली मारहाण)

 

जखमी यशुदासला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने गडचिरोली येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी (दि. १३) पहाटे त्याचा मृत्यू झाला.

 

या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ठेकेदार मंगेश सेलोटे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे व त्यांचे पथक करीत आहे.

Leave a Comment

+