चंद्रपूरच्या 'सखी' सेंटरमध्ये समुपदेशकच नाही, महिलांचे हाल कोण पाहणार? BJP महिला मोर्चाची धडक

May 08, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर : २०१५ साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृवात महिला व बाल कल्याण मंत्रालयाने घरघुती हिंसाचार होणाऱ्या महिलांना आधार देण्यासाठी 'वन स्टॉप सेंटर (सखी)' हे केंद्र संपूर्ण देशात सुरू केले. या केंद्रात महिलांना वैद्यकीय सेवा, समुपदेशन, कायदेविषयक सल्ला, रेस्क्यू, पोलीस सुविधा या सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध होतात. (चंद्रपुरात अपघाताचे सत्र, २ दिवसात तिघांचा मृत्यू)

 

चंद्रपूर शहरातील जलनगर येथे असलेल्या या सेंटरला दिनांक ७ मे ला भाजपा महिला मोर्चाकडून आकस्मिक भेट देण्यात आली. यावेळी या सेन्टरमध्ये पूर्ण वेळ समुपदेशकाची नियुक्ती नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. तसेच सेंटर गुगल मॅप वर लोकेटेड नसणे, या सेंटर बद्दल जनजागृती नसणे, सेंटरची वेबसाईट उपलब्ध नसणे या सारख्या अनेक समस्या निदर्शनास आल्या. त्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेऊन त्यांना या समस्यां बाबत निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी जिल्हाधिकाऱ्यां सोबत महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी या समस्या संदर्भात विस्तृत चर्चा सुद्धा केली.

 

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी यावेळी या विषयाची गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजप महिला आघाडीच्या चंद्रपूर शहर अध्यक्ष छबु वैरागडे, नगरसेविका जयश्री जुमडे, नगरसेविका सुनीता जयस्वाल, नगरसेविका सविता सरकार, भाजपा नेत्या नम्रता ठेमस्कर, चंद्रकला सोयाम, रुपाली आंबटकर, हिना शेख, आशा उके, रेवती चौखंडे, सीमा धुर्वे,सरोज मिश्रा, महेंद्र जुमडे, प्रलय सरकार यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

+